मुंबईचे तापमान वाढले<bha>;</bha> पारा २० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:07 AM2021-02-13T04:07:19+5:302021-02-13T04:07:19+5:30

वातावरण तापदायक : थंडीचे प्रमाण झाले कमी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात ...

Mumbai's temperature rises to 20 degrees Celsius | मुंबईचे तापमान वाढले<bha>;</bha> पारा २० अंशांवर

मुंबईचे तापमान वाढले<bha>;</bha> पारा २० अंशांवर

Next

वातावरण तापदायक : थंडीचे प्रमाण झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात नोंदविण्यात येणारे कमाल आणि किमान तापमान वाढू लागले आहे. कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांवर, तर किमान तापमानाचा पारा २० अंशांवर येऊन ठेपला आहे. कमाल आणि किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे येथील थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. रात्री पडणारा किंचित गारवा वगळता मुंबईत दिवसभर तापदायक वातावरणाची नोंद होत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल. मागील आठवड्यापासून कोकणच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. तापमान वाढ पुढील काही दिवस अशीच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

* प्रदूषणाची समस्या कायम

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे नोंदविण्यात येणारे किमान तापमान काहीअंशी स्थिर असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मात्र, येथील किमान तापमानातही पुढील काही दिवसांत वाढ होईल, अशी शक्यताही वर्तविली आहे. दुसरीकडे मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असतानाच येथील प्रदूषण अद्याप कमी झालेले नाही. प्रदूषणाचा आलेख कायम वरच असून, वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकर त्रासले आहेत.

.......................

Web Title: Mumbai's temperature rises to 20 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.