मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांना ९ % जलसाठा हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:11 AM2020-08-22T02:11:16+5:302020-08-22T07:03:25+5:30

वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित असते.

Mumbai's thirsty lakes need 9% water storage | मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांना ९ % जलसाठा हवा

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांना ९ % जलसाठा हवा

Next

मुंबई : मुसळधार पाऊस मुंबईसह तलाव क्षेत्रात सतत कोसळत आहे. तलाव क्षेत्रात आतापर्यंत ९१ टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मुंबईतील २० टक्के पाणीकपात कमी करून आता १० टक्के करण्यात आली आहे. आता फक्त नऊ टक्केच जलसाठा कमी आहे.
तलावांमध्ये गेल्या १७ दिवसांच्या कालावधीत ५४ टक्के जलसाठा जमा झाला आहे. आतापर्यंत तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहू लागले आहेत. तसेच मध्य वैतरणा, भातसा तलाव लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित असते. सध्या १३ लाख १५ हजार जलसाठा जमा झाला आहे.
>जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान उपयुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२८९२५ १६३.१६
तानसा १२८.६३ ११८.८७ १४४४७५ १२८.६०
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.३२
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.३२
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ १७२०२२ ६०१.८०
भातसा १४२.०७ १०४.९० ६४८२०३ १३९.५४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८६०५४ २८३.६५

Web Title: Mumbai's thirsty lakes need 9% water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.