मुंबईचे तीन बस स्थानक अ गटात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 04:01 PM2023-05-17T16:01:14+5:302023-05-17T16:01:54+5:30

या अभियानात उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. 

Mumbai's three bus stations in Group A | मुंबईचे तीन बस स्थानक अ गटात 

मुंबईचे तीन बस स्थानक अ गटात 

googlenewsNext

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “ स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानचा प्रारंभ मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आला. या अभियानात उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. 

मुंबई विभागीय स्तरावर विभाग नियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये बाहेरील सदस्य ‘लोकमत’चे प्रतिनिधी नितिन जगताप (प्रवासी संघटना प्रतिनिधी), गणेश भक्त कोकण प्रवासी संघटचे दीपक चव्हाण यांचा दोन महिन्यांसाठी समावेश  करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई विभाग नियंत्रक मोनिका वानखेडे यांनी दिली.

बस फेऱ्यांनुसार स्थानकांचे वर्गीकरण
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा कालावधी हा १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२५ असेल. बसस्थानकांचे भौगोलिक स्थान, प्रवासी चढ-उतार बस फेऱ्यांची संख्या समान नाही.  त्यानुसार बसस्थानकांचे वर्गीकरण त्रिस्तरीय असेल. बसस्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार विचारात घेऊन अ, ब, ‘क’ वर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे.

अ गट - कुर्ला, पनवेल, उरण
ब गट - मुंबई परळ
क गट - दादर एसी बसस्थानक
 

Web Title: Mumbai's three bus stations in Group A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.