लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनासह लॉकडाऊनमुळे सर्वांचेच आर्थिक गणित विस्कटले असताना, आता वाढीव टोल दाराने वाहनचालकांना आणखी एक दणका दिला आहे. येत्या १ आॅक्टोबरपासून मुंबईच्या टोल नाक्यावरील दरात पाच ते पंचवीस रुपयांची वाढ होणार आहे.
मुंबईत प्रवेश करताना मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावर एमईपी कंपनीचे टोलनाके लागतात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) विचार केल्यास येथील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च २००२ ते २०२७ या २५ वर्षांच्या काळातील वसुलीसाठी येथील नाक्यांवर टोल आकारला जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यासोबत झालेल्या करारानुसार येथील टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ केली जाते. त्यानुसार, १ आॅक्टोबर रोजी पुन्हा टोलचे दर वाढतील.
दरम्यान, खड्डे आणि वाहतूककोंडीची डोकेदुखी असताना टोल वाढवणे, हे अन्यायकारक असल्याचा नाराजीचा सूर वाहनचालकांमध्ये आहे. टोलचे दर वाढवले, तर रस्ते खड्डेमुक्त होणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे यामुळे प्रवास तर महागणार नाही ना, अशी चिंता सर्वसामान्यांना सतावत आहे.येथे आहेत टोल नाकेमुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्गआकारण्यात येणारे नवे दरअवजड वाहने : "१६०मध्यम अवजड वाहने :"६५ रुपयेट्रक आणि बस : "१३०छोटी वाहने : "४०
पाच नाक्यांसाठीच्यामासिक पाससाठी : "१५००मासिक पास "१००नी महागलाच्कार, जीप अशा वाहनांच्या एकेरी प्रवास दरात ५ रुपयांची वाढ होईल. त्यानुसार, त्यांना ४० रुपये टोल द्यावा लागेल.च्मिनी बस आणि २० प्रवासी वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोलमध्ये १० रुपये वाढ करण्यात आल्याने त्यांना आता ६५ रुपये मोजावे लागतील.च्ट्रक आणि बसला १०५ ऐवजी १३० रुपये, तर अवजड वाहनांना १३५ ऐवजी १६० रुपये मोजावे लागतील.च्पाच नाक्यांसाठीच्या मासिक पाससाठी आता १,४०० ऐवजी १,५०० रुपये आकारले जातील.