मुंबईची तुंबई! राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By जयंत होवाळ | Published: July 8, 2024 07:41 PM2024-07-08T19:41:51+5:302024-07-08T19:42:57+5:30
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी पाणी तुंबले होते,तेव्हा आम्हाला जबाबदार धरले होते.तेव्हा आरोप करणारे सुपात होते,आता तेच जात्यात आहेत असे ते म्हणाले.
मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकीय आरोप -प्रत्यारोपांच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. बेकायदा मुख्यमंत्र्यांनी फक्त नाल्याच्या काठावर उभे राहून फोटोसेशन केले,अशी बोचरी टीका करतानाच पावसाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेची अजिबात तयारी नव्हती हे उघड झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.तर पावसाबाबत विरोधक चुकीचा नरेटिव्ह पसरवत आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी पाणी तुंबले होते,तेव्हा आम्हाला जबाबदार धरले होते.तेव्हा आरोप करणारे सुपात होते,आता तेच जात्यात आहेत असे ते म्हणाले. तर ,या प्रकाराला पालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे,अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. पालिका विसर्जित झाल्यापासून पालिका प्रशासनाला अजिबात कसलेही उत्तरदायित्व नाही.दोन वर्षे पालिकेची निवडणूक नाही,१५ प्रभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रलंबित आहे,यांना फक्त आवडत्या कंत्राटदारांवर प्रेम आहे , मुंबईवर नाही नाही,अशी टीका आदित्य यांनी केली.
पाण्याचा निचरा करणारे पंप, पंपिंग स्टेशन, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या टाक्या, अशा सर्व क्षमता असूनही आज पावसाने मुंबई विस्कळीत झाली. आहोत,असे ते म्हणाले. तर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबई महानगरपालिकेचे सगळे दावे पाण्यात गेले,असा आरोप केला. नालेसफाईवर १०० कोटींहून अधिक रुपये खर्च केले ते कुठे गेले, नाले साफ झाले असते तर हीच वेळ आली नसती. पाण्याचा निचरा करण्यासाठी ४५० ठिकाणी पंप्स लावले गेले त्याचा पण काहीही उपयोग झाला नाही. या वर्षी मुंबईत कुठेही पाणी साचणार नाही असा राज्य सरकारचा दावा होता त्याचे काय झाले असा सवाल त्यांनी केला.