Join us

कोसळधारेने मुंबईची तुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:14 PM

बुधवारी सकाळी तर धो धो कोसळलेल्या १२१.६ मिलीमीटर एवढया पावसाने तारांबळ उडाली; आणि पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली.

ठळक मुद्देकुलाबा : १२१.६ मिमीसांताक्रूझ : ९६.६ मिमीगेल्या २४ तासांचा पाऊस मिमीमध्ये. शहर ८९.२७ पूर्व उपनगर ४८.४७ पश्चिम उपनगर ७५.१२

 

१४ जुलैपर्यंतचा पाऊस मिमीमध्ये.शहर ९२९.२९पूर्व उपनगर ९३७.३६पश्चिम उपनगर ९४१.५१

मुंबई : अवघ्या मुंबापुरीवर सर्वदूर दाटून आलेल्या काळ्याकुटट ढगांनी गर्दी केली. सोसाटयाचा वारा वेगाने वाहू लागला. ढगांचा गडगडाट सुरु झाला. आणि समुद्राहून वेगाने दाखल होणा-या पावसाने मुंबईकरांना जणूकाही कोसळधारेची वर्दीच दिली. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजल्यापासून सुरु झालेला हा खेळ बुधवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरु होता. बुधवारी सकाळी तर धो धो कोसळलेल्या १२१.६ मिलीमीटर एवढया पावसाने तारांबळ उडाली; आणि पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली.

मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत कोसळलेल्या पावसाने ठिकठिकाणी तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यांसह सखल भागात पाणी साचले असतानाच वरुणराजा मात्र धो धो कोसळत होता. सकाळपासून पडलेल्या पावसामुळे हिंदमाता, दादर टी.टी, सायन रोड नंबर २४, माटुंगा येथील रूईया कॉलेज, वडाळा येथील शेख मिस्त्री दर्गा, बीपीटी कॉलनी, दादर येथील टिळक ब्रीज, अंधेरी सब वे येथील सखल भागात पाणी साचले होते. येथील पाण्याचा निचरा करण्याचे काम दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरु होते. हिंदमाता, गांधी मार्केट आणि सायन येथे पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.

 

पावसाने सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सांताक्रूझ, वांद्रे, महालक्ष्मी, राम मंदिर, कुलाबा, कुर्ला या परिसरांना झोडपून काढले असून, येथे ६० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी देखील मुंबईसह कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

 

पडझड५ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला१२ ठिकाणी झाडे कोसळली२१ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या

........................

२०२० पावसाची टक्केवारीकुलाबा ५१.९७ %सांताक्रुझ ४५.९९%

........................  

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटमानसून स्पेशल