मुंबईचा वरचष्मा

By admin | Published: November 25, 2014 12:06 AM2014-11-25T00:06:03+5:302014-11-25T00:08:38+5:30

राज्य मैदानी स्पर्धा : पुणे द्वितीय स्थानावर

Mumbai's upper church | मुंबईचा वरचष्मा

मुंबईचा वरचष्मा

Next

इस्लामपूर : येथील राजारामबापू पाटील क्रीडा संकुलात पार पडलेल्या राज्यस्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत लहान व मध्यम पल्ल्याच्या धावणे आणि उड्यांच्या सर्व क्रीडा प्रकारांत पदकांची लयलूट करत मुंबई विभागाने वरचष्मा कायम ठेवताना सर्वसाधारण जेतेपद पटकाविले. लांब पल्ला धावणे, चालणे, क्रॉसकंट्री व फेकीच्या क्रीडा प्रकारांत पुणे विभागाने उपविजेतेपद मिळविले.
गेल्या चार दिवसांपासून येथील राजारामबापू क्रीडा संकुलात या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा झाल्या. १४, १७ व १९ वर्षे वयोगटांतील राज्याच्या नऊ विभागांतील सुमारे दोन हजार खेळाडू मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेत कौशल्य पणाला लावले. एकूण ९३ क्रीडाप्रकारांचा या राज्यस्तरीय स्पर्धेत समावेश होता.
स्पर्धेतील १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर अशा लघुपल्ल्याच्या धावणे प्रकारात मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. तसेच लांबउडी, उंचउडी, अडथळा, रिले अशा क्रीडाप्रकारातही त्यांनी पदकांची लयलूट केली. स्पर्धेतील पदक तालिकेत त्यांनी अव्वल स्थान पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
उपविजेतेपद मिळविणाऱ्या पुणे विभागाच्या खेळाडूंनी ८०० मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर, ४ बाय ४०० मीटर रिले, क्रॉसकंट्री अशा क्रीडा प्रकारात पदकांची कमाई केली. पदक तालिकेत पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
शासनाच्या क्रीडा विभागाच्या धोरणानुसार राज्य स्पर्धेतील सर्वसाधारण आणि उपविजेतेपद ठरविण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. स्पर्धेतील एकूण ९३ क्रीडा प्रकारांत पदक संख्येत मुंबई विभाग पहिल्या स्थानावर, तर पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले.

Web Title: Mumbai's upper church

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.