मुंबई : मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रस्तावित सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये अनुक्रमे वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडूप आणि घाटकोपर या प्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के सांडपाण्यावर तृतीय स्तरावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी करण्यात येणार आहे. सर्व सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी १ हजार ३४६.४४ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत १ हजार ९५५.८६ कोटी मिठी नदी अंतर्गत कुर्ला ते धारावीपर्यंतच्या मलजल प्रक्रिया केंद्रांपर्यंत मलजल बोगदा उभारण्याच्या कामाची निविदा मागविली आहे. या प्रकल्पाचा खर्च ५४४.७६ कोटी आहे.बोरिवली ते मालाडपर्यंत मलजल बोगदा आणि गोरेगाव उदंचन केंद्र ते मालाड मलजल बोगद्याकरिता ६० कोटींची तरतूद आहे.भायखळा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम मे २०२१मध्ये पूर्ण होईल. या सर्व कामांसाठी ४४१.५० कोटींची तरतूद आहे.नवीन वर्सोवा आंतरप्रवाही उदंचन केंद्र : २९३ कोटीवर्सोवा मलजल बोगदा : १५०.९५ कोटीएस. व्ही. रोड मलजल बोगदा : ३३५ कोटीमिठी नदी मलजल प्रक्रिया केंद्र : १४६ कोटीमालाड आंतरप्रवाही उदंचन केंद्र : ६७० कोटी मलजल वाहिन्यांची सफाई करताना मानवी संपर्क कमी करण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. या अंतर्गत मलनि:सारण प्रचालन खात्यांतर्गत १६८.७६ कोटींची तरतूद आहे.मुंबई मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमांतर्गत रस्त्यांवर ९३.६८ किलोमीटर लांबीच्या मलजल वाहिन्या टाकण्यासह त्याचे आकारमान वाढविण्याचे काम नियोजित आहे. त्यानुसार २७५.३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील सांडपाण्याचा वापर होणार पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 5:35 AM