मुंबईवरील जलसंकट कायम!

By admin | Published: September 16, 2015 01:38 AM2015-09-16T01:38:29+5:302015-09-16T01:38:29+5:30

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्राकडे पावसाने फिरवलेली पाठ कायम आहे. त्यामुळे याआधी शहरात लागू करण्यात आलेली २० टक्के कपात कायम राहणार असल्याचे

Mumbai's water crisis persists! | मुंबईवरील जलसंकट कायम!

मुंबईवरील जलसंकट कायम!

Next

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्राकडे पावसाने फिरवलेली पाठ कायम आहे. त्यामुळे याआधी शहरात लागू करण्यात आलेली २० टक्के कपात कायम राहणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.
राज्यासह मुंबईत पाऊस पडत असला तरी जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. परिणामी भविष्यातील नियोजनासाठी सोमवारी महापालिकेत पाणी या विषयासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी यापुढेही २० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे सांगितले. पाणीपुरवठ्यातील कपात ही १५ टक्के आणि तिथून पुढे वेळेनुसारच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१५ सप्टेंबर रोजी सातही तलावांत एकूण ९ लाख ९६ हजार ४९२ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी अप्पर वैतरणा आणि भातसा हे दोन तलाव दुथडी भरून वाहू लागले होते. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने एकही तलाव ओव्हर फ्लो झालेला नाही.
आज घडीला गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तलावांत ३२ टक्के पाण्याचा तुटवडा आहे. पुढील १५ दिवसांत पाऊस पडला तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पाणीकपातीनंतर केलेली कारवाई
शहरात १७५१ पाणी गळती, १७४६ गळती बंद
पश्चिम उपनगरांत १४४५ पाणीगळती, पैकी १ हजार ३५३ बंद
पूर्व उपनगरांत ११९४ पाणी गळती, पैकी १०९४ बंद
एकूण ३७७५ गळती शोधून ३७०४ गळती बंद करण्यात आल्या.
४३१ अनधिकृत जोडण्यांपैकी ४२८ हटवल्या. ३ ठिकाणी पोलीस संरक्षण
३१ अनधिकृत पंपांवर कारवाई
तक्रार निवारण केंद्रावर ६८५८ तक्रारी
६४९१ तक्रारींचे निवारण, पैकी ३६७ तक्रारी प्रलंबित

१ लाख ५४ हजार १७७ नादुरुस्त मीटरधारकांना नोटीस देणार, पैकी २४ हजार ३३२ मीटरधारकांना नोटीशी पाठवल्या.
डोंगराळ भागातील पाणीप्रश्नी मायक्रो प्लॅनिंग

१५ सप्टेंबर रोजी सातही तलावांत एकूण ९ लाख ९६ हजार ४९२ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी अपर वैतरणा आणि भातसा हे दोन तलाव दुथडी भरून वाहू लागले होते. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने एकही तलाव ओव्हरफ्लो झालेला नाही.

Web Title: Mumbai's water crisis persists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.