मुंबईच्या जलसाठ्यात २१ टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:54 AM2018-06-28T03:54:40+5:302018-06-28T03:54:44+5:30

जून महिन्यात ‘वीकेण्ड’ वगळता पावसाने दडी मारल्याने पाण्याचे टेन्शन वाढत असताना, तलाव क्षेत्रात तब्ब्ल २१ दिवसांचा जलसाठा वाढला आहे

Mumbai's water supply has increased by 21 percent | मुंबईच्या जलसाठ्यात २१ टक्क्यांची वाढ

मुंबईच्या जलसाठ्यात २१ टक्क्यांची वाढ

Next

मुंबई : जून महिन्यात ‘वीकेण्ड’ वगळता पावसाने दडी मारल्याने पाण्याचे टेन्शन वाढत असताना, तलाव क्षेत्रात तब्ब्ल २१ दिवसांचा जलसाठा वाढला आहे. रविवार व सोमवारी हजेरी लावणाऱ्या मुसळधार पावसाने हा सुखद दिलासा दिला आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये चारच दिवसांत ७५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.
गेली दोन वर्षे तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मुंबईकरांना पाण्याचे टेन्शन नव्हते. या वर्षीही चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे तलावांमधील जलसाठ्यात घट होत होती. यामुळे पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती.
रविवार, २४ जून रोजी तलावांमध्ये जेमतेम एक लाख ९५ हजार जलसाठा होता. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये तलाव क्षेत्रातील जलसाठा ७५ हजार दशलक्ष लीटरने वाढला आहे. मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. तलावांमध्ये आजच्या घडीला जेमतेम १८ टक्केच जलसाठा आहे.


मुंबईला हवेय इतके पाणी
मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.
मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४ हजार २०० दशलक्ष लीटर इतकी आहे.
दररोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे ९०० दशलक्ष लीटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.


जलसाठ्याची आकडेवारी मीटरमध्ये
तलाव कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १५५.८९
तानसा १२८.६३ ११८.८७ १२१.५९
विहार ८०.१२ ७३.९२ ७६.३२
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३५.८९
अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ५९५.४०
भातसा १४२.०७ १०४.९० ११२.७२
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २५३.८३

Web Title: Mumbai's water supply has increased by 21 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.