पोलिसाला मारहाण प्रकरण: राम कदमांचा आरोपींना वाचविण्यासाठी फोन!

By मोरेश्वर येरम | Published: January 11, 2021 06:28 PM2021-01-11T18:28:19+5:302021-01-11T18:31:30+5:30

खैरमोडे यांनी भाजपच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

mumbao police assault case bjp mla Ram Kadam calls to save accused | पोलिसाला मारहाण प्रकरण: राम कदमांचा आरोपींना वाचविण्यासाठी फोन!

पोलिसाला मारहाण प्रकरण: राम कदमांचा आरोपींना वाचविण्यासाठी फोन!

Next
ठळक मुद्देमानवतेच्या दृष्टीकोनातून आरोपींना सोडण्याची राम कदमांची पोलिसाकडे विनंतीपवई येथे मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबलला झाली होती मारहाणपोलिसाला मारहाण करणारे राम कदम यांचे कार्यकर्ते

मुंबई
पवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. खैरमोडे यांनी भाजपच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या तिघांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला. राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. 

"तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही", असं सांगत राम कदम यांनी खैरमोडे यांच्याकडे तक्रार मागे घेण्याची मागणी केली. 

दरम्यान, कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न असून असं करणं योग्य ठरणार नाही, असं ठामपणे सांगून राम कदम यांच्या मागणीला स्पष्ट नकार दिला. 

राम कदम यांच्या भूमिकेचा निषेध
पोलिसाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी फोन करण्याच्या राम कदम यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. "राम कदम यांनी फोन करणं ही अतिशय दुर्दैवी बाब असून कायद्याचं संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना पाठिशी घालून राज्यात उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी संस्कृती आणण्याचा विचार आहे का?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांनी केला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन येत धडक दिली होती. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना कार्यकर्त्यांनी रिक्षातच खैरमोडे यांना जबर मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले. मारहाणीत खैरमोडे रक्तबंबाळ झाले होते. 
 

Web Title: mumbao police assault case bjp mla Ram Kadam calls to save accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.