मुंबापुरीला मखरांचा साज, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा कल वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:48 AM2017-08-20T03:48:54+5:302017-08-20T03:49:14+5:30

गणेशोत्सवाच्या आगमनाला काही दिवस उरले असताना, सजावटीचे साहित्य बाजारपेठात दिसू लागले आहे. गणेशोत्सवात महत्त्वाची सजावट मखराची असते. सुंदर व आकर्षित मखर बाजारपेठात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा कल नागरिकांमध्ये सध्या वाढतो आहे.

Mumbapuri is celebrating the festival of euphemism, eco-friendly Ganesh festival | मुंबापुरीला मखरांचा साज, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा कल वाढतोय

मुंबापुरीला मखरांचा साज, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा कल वाढतोय

Next

- सागर नेवरेकर ।

मुंबई : गणेशोत्सवाच्या आगमनाला काही दिवस उरले असताना, सजावटीचे साहित्य बाजारपेठात दिसू लागले आहे. गणेशोत्सवात महत्त्वाची सजावट मखराची असते. सुंदर व आकर्षित मखर बाजारपेठात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा कल नागरिकांमध्ये सध्या वाढतो आहे. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशा मखरांनी बाजारपेठ भरून गेली असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने अशाच काहीशा मखरांचा मुंबापुरीवर साज चढला आहे.
दादर येथील छबिलदास मार्गावर विविध प्रकारचे मखर उपलब्ध आहेत. यामध्ये गोल्डफिश मखर, मयूर मखर, मोदकम मखर, मयूर महल, घोडा रथ आणि राजहंस रथ इत्यादी प्रकाराचे मखर उपलब्ध आहेत. मखर थर्माकोलचे बनविलेले असून, यात टाचणी, खिळ््याचा वापर केला जात नाही. लॉकिंक प्रकारात मखर बनविले जातात, तसेच मखर फोल्डिंग करून कुठेही घेऊन जाऊ शकतो. सध्या नवीन प्रकारामध्ये हस्तिदंत मखर हा विशेष पाहायला मिळतो. सुंदर व आकर्षक असा हा मखर असून, त्याला बाजारात चांगली मागणी आहे. पाच हजारांपासून मखरांच्या किमती सुरू होत आहेत. विशेष म्हणजे, ६० टक्के मखर हे हाताने बनविले जातात. कर्नाटक, गुजरात, कोकण, तसेच यूएई, न्यूझीलँड, आॅस्ट्रेलिया, दुबई येथून मखरांना मागणी असते. मखरामध्ये पाण्याच्या रंगांचा वापर केला जातो. रंगावरती लॅकरचे कोटिंग केले जाते. लॅकरच्या कोटिंगमुळे रंग इतरत्र पसरत नाहीत, अशी माहिती अक्षय डेकोरेटर्सच्या अरुण दरेकर यांनी दिली.

पाच हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत किंमतीचे मखर उपलब्ध आहेत. सर्व मखर थर्माकोलने बनविलेले असून पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकतात. पर्यावरणाला हानी पोहचणार नाही, अशा उद्देशाने बनविलेले मखर उपलब्ध आहेत. येथून मखर नेणारी माणसे दोन ते तीन वर्ष वापर करतात. काही मखर लॉकिंक प्रकाराचे तर टाचणी पिनांच्या साहाय्याने बनविलेले मखर उपलब्ध आहेत.

दिवाळीनंतर मखर बनवायला सुरुवात केली जाते. ३० ते ३५ कामगार मखर बनवतात. एक फुटापासून ते आठ फुटापर्यंतच्या मखरांचा समावेश आहे. बहुतेक मखर हे स्वहातानेच बनविले जातात. युएस, लंडन, अ‍ॅबरोड, सौदी अरब, कॅनडा, बेल्जियम इत्यादी देशातून मागणी असते. तसेच महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हैद्राबाद इत्यादी राज्यात मागणी असते.

पांढºया थर्माकोलवर १८ टक्के जीएसटी लागतो. तर कलरच्या थर्माकोलवर २८ टक्के जीएसटी लागतो. मागील वर्षापेक्षा यावर्षी मखराची किंमत १० टक्क्याने वाढली आहे, अशी माहिती हरदेव आर्टच्या संदेश दाबाडे यांनी दिली.

लालबाग मधील प्रभाकुटीर येथील उत्सवी संस्था पर्यावरणपूरक वस्तूंचे महत्त्व पटवून देण्याचे प्रयत्न करत आहेत. ६ इंचापासून ते २१ फुटांच्या मुर्तीपर्यंत पुठ्यांचे मखर तयार करण्यात आले आहेत. या कलाकृती घरगुती मूर्तीसाठी अवघ्या २०० रुपयांपासून ते सार्वजनिक ९ फुटी मुर्तीसाठी ९ हजारांत उपलब्ध आहेत. मखर कागदी पुठ्ठ्यापासून बनवलेले, हाताळण्या सोपे, पर्यावरणपूरक आणि बरीच वर्षे वापरता येण्याजोगे आहेत.

विशेषत: लहान मुलांसाठी छोटी मखरे उपलब्ध आहेत. २०० ते ३०० पर्यंत छोट्या मखरांची किंमत आहे. यावर्षी नवीन मयुरासन मखर घरगुती गणेशोत्सवासाठी डिझाईन केले गेले आहे. तसेच यामध्ये सुर्य मखर, सुवर्ण मखर, कोकण मखर, ३डी गणेश मखर, वनराई मखर, मयुरासन डायमंड मखर, राजसिंहासन मखर ही लहान मुलांसाठी मखरे बनविण्यात आली आहेत.

जयपूर मखर, कोकण मंदिर, सुवर्ण मखर, नवरंग मखर, सुर्य मखर आणि वनराई मखर इत्यादी मोठी मखरे बनविण्यात आली आहेत. साधारण १ ते २१ फुटांच्या मुर्तींसाठी मखरे उपलब्ध आहेत. गणेशोत्सवासाठी व इतर सनासुदींसाठी पर्यावरणाला अनुकूल (इको फे्रंडली) कागदी पुठ्ठ्यांची फोल्डींग डेकोरेशन २० वर्षापर्यंत वापरु शकता, असे उत्सवी संस्थेचे नानासाहेब शेंडकर यांनी सांगितले.

Web Title: Mumbapuri is celebrating the festival of euphemism, eco-friendly Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.