मुंबापुरी गारेगार!

By admin | Published: January 3, 2015 02:05 AM2015-01-03T02:05:11+5:302015-01-03T02:05:11+5:30

राज्याला एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानात तब्बल ४ अंशाची घसरण झाली आहे.

Mumbapuri Gararigar! | मुंबापुरी गारेगार!

मुंबापुरी गारेगार!

Next

मुंबई : राज्याला एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानात तब्बल ४ अंशाची घसरण झाली आहे. येथील किमान तापमान १५ अंशावर स्थिर असले तरी कमाल तापमान ३२ अंशाहून थेट २८ अंशावर घसरल्याने वातावरणात गारवा आला आहे. परिणामी मुंबईकरांना सध्या रात्रीसह दिवसादेखील हुडहुडी भरवणारी थंडी बोचते आहे.
पश्चिम - मध्य बंगालचा उपसागर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओरिसाच्या किनाऱ्यावर निर्माण झालेल्या कमी दबाच्या क्षेत्रामुळे गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कायम असल्याने पुढील ४८ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामानात बदल होत असतानाच मुंबईकरांना थंडीने हुडहुडी भरली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी कमाल तापमानात ४ अंशाची घसरण झाली असून, दिवसा थंड वारे वाहत असल्याने मुंबईकरांना गारव्याला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे किमान तापमानाचा पारा १५ अंशावर स्थिर असून, रात्रीच्या हवेतील गारवा कायम राहिल्याने मुंबईकरांना रात्रीदेखील हुडहुडी भरविणारी थंडी भरत आहे. हवामानातील बदलामुळे ४८ तास मुंबईतील आकाशन ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे २८, १६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)

च्अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामानात बदल होत असतानाच मुंबईकरांना थंडीने हुडहुडी भरली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी कमाल तापमानात ४ अंशाची घसरण झाली असून, दिवसा थंड वारे वाहत असल्याने मुंबईकरांना गारव्याला सामोरे जावे लागत आहे. हवामानातील बदलामुळे पुढील ४८ तासांत मुंबईतील आकाश सामान्यत: ढगाळ राहील.

Web Title: Mumbapuri Gararigar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.