Join us  

मान्सूनसाठी मुंबापुरी सज्ज

By admin | Published: June 03, 2017 6:54 AM

गुरुवारी रात्री पूर्व उपनगरातील कुर्ला, साकीनाका, मरोळ, अंधेरी, मालाडसह वांद्रे आणि खार येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुरुवारी रात्री पूर्व उपनगरातील कुर्ला, साकीनाका, मरोळ, अंधेरी, मालाडसह वांद्रे आणि खार येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असतानाच तलाव क्षेत्रातही पावसाने खाते उघडले आहे. याच मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनदरम्यान मुंबापुरी कोलमडू नये म्हणून मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सज्ज झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असून ते २४ तास मुंबईकरांच्या सेवेत राहणार आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पावसाळ्यातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून ते राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, पोलीस इत्यादी आपत्कालीन नियंत्रण कक्षांशी संपर्कात राहणार आहेत. सदर नियंत्रण कक्ष १५ आॅक्टोबरपर्यंत कार्यरत राहतील. प्राधिकरणाचे प्रकल्प राबविण्यात येत असलेल्या परिसरात पावसाळ्यादरम्यान होणारी वाहतूक सुरळीत राहावी याकरिता हे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच विविध ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरू असलेल्या भागात पाणी साचणार नाही याची खात्री नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी घेणार आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी सुयोग्य बॅरिकेडिंग करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर वेळोवेळी जमा होणाऱ्या चिखलाची ताबडतोब विल्हेवाट लावणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे. ज्या परिसरात ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी अतिरिक्त क्षमता असणारे पाण्याचे पंप उपलब्ध करून देण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.नियंत्रण कक्षाकडूनमिळेल मदतपावसाळ्यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूककोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षांकडून मुंबईकरांना मदत मिळू शकते. अनपेक्षित घटना आणि धोका निर्माण होण्याची शक्यता याबाबत जनतेकडून माहिती मिळाल्यास त्याचेसुद्धा नियंत्रण कक्षाकडून स्वागत करण्यात येईल. नियंत्रण कक्ष रेल्वे, मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस, बेस्ट, अग्निशमन दल अशा विविध संस्थांशी सलग्न राहून नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे.नियंत्रण कक्षाकडून २६५९१२४१, २६५९४१७६ आणि ८०८०७०५०५१ व टोल फ्र ी क्र मांक १८००२२८८०१ या दूरध्वनी क्रमांकांवर मदत मिळू शकेल.