मुंबापुरीला पावसाने धो धो धुतले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:36 PM2020-07-16T13:36:31+5:302020-07-16T13:39:36+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारीदेखील पावसाचा जोर कायम राहिला.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारीदेखील पावसाचा जोर कायम राहिला असून, सकाळी आठच्या नोंदीनुसार मुंबईत सरासरी १९१.२ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. महालक्ष्मी, कुलाबा, वांद्रेसह लगतच्या उपनगरातदेखील पावसाने मुसळधार हजेरी लावली असून, या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड झाली आहे. सुदैवाने यात काही हानी झालेली नाही.
गुरुवारी सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे हिंदमाता, वडाळा येथील सक्कर पंचायत चौक, सायन येथील एसआयईएस कॉलेज, धारावी रेस्टॉरंट, शेख मिस्त्री दर्गा रोड, पोस्टल कॉलनी, चेंबूर येथील टेबी ब्रीज, देवनार येथील बैंगनवाडी, अंधेरी सबवे, पोयसर सबवे, खार सबवे, मालाड सबवे आणि मिलन सबवे येथील सखल भागात पाणी साचले होते. महापालिकेने येथील पाण्याचा निचरा केल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरु असतानाच एकूण २८ ठिकाणी झाडे कोसळली. १२ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर ५ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.
..........................
पाऊस मिमी
शहर १३०.४५
पूर्व उपनगर ९४.५५
पश्चिम उपनगर ११२.१५
..........................
कुठे पडला किती पाऊस
नरिमन पॉइंट १२९.४
फोर्ट १४३.९७
मांडवी फायर स्टेशन ११९.७८
मेमनवाडा १३०.७८
ग्रँट रोड १४१.७
मलबार हिल १५६.९५
मुंबई सेंट्रल १३८.१६
वडाळा १४७.३१
दादर १६२.३२
धारावी १५३.३९
वरळी १६४.३३
हाजीअली १४४.७४
वांद्रे १७९.५८
मरोळ ४२.१८
विलेपार्ले १६७.१
अंधेरी १७९.७६
वर्सोवा १६३.५३
मालवणी ८३.३
चिंचोळी ९३.४६
मालाड ९९.०६
गोरेगाव ९५.७४
बोरीवली ९१.१४
दहिसर ७२.३३
कांदिवली ९७.४८
कुर्ला ११०.९४
चेंबुर १४४.९९
विक्रोळी १०८.१७