मुंडे भगिनींनी मानले फडणवीसांचे आभार, देवेंद्रांनीही केलं कामाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:55 PM2021-12-29T15:55:54+5:302021-12-29T15:59:25+5:30

सद्यस्थितीत अहमदनगर-बीड-परळी हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती

Munde sisters pankaja and pritam thanked Fadnavis, Devendra also appreciated the work of beed railway | मुंडे भगिनींनी मानले फडणवीसांचे आभार, देवेंद्रांनीही केलं कामाचं कौतुक

मुंडे भगिनींनी मानले फडणवीसांचे आभार, देवेंद्रांनीही केलं कामाचं कौतुक

Next
ठळक मुद्देसद्यस्थितीत अहमदनगर-बीड-परळी हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती

मुंबई/बीड - जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळी  नगरहून सोलापूर वाडी व तेथून आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे. पटरीवरून  रेल्वे धावल्याचे पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याने आनंद ओसंडून वाहत होता. यासंदर्भात माजीमंत्री पंकजा मुंडेंनी ट्विट करुन माहिती दिली होती. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले होते.

सद्यस्थितीत अहमदनगर-बीड-परळी हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती. पण, बुधवारी सकाळी नगरवरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाली. बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळाले. सोलापूर वाडी, कडा, आष्टी या ठिकाणीहून रेल्वे धावल्यामुळे ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तत्पूर्वी पंकजा मुंडेंनी ट्विट करुन रेल्वे धावणार असल्याची माहिती दिली होती. यावेळी, उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये !!! माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली. खासदार प्रीतम मुंडे अजून एक रेकॉर्ड तुमच्या नावावर झाल्याचं पंकजा यांनी म्हटलं.


पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले. त्यानंतर, फडणवीस यांनी पंकजा मुंडेंचे ट्विट रिट्विट करत मुंडे भगिनींचे कौतुक केले. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी तुम्ही केलेल्या पाठपुराव्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार... असेही फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

गोपीनाथ मुंडेंनी दिलं योगदान

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठी अडचणी होत होती. 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र, त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले. दरम्यान, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली.

दरम्यान, आज याच मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील सर्वात मोठ्या रेल्वे पुलावरून हायस्पीड रेल्वे आज बुधवारी सुखरूपपणे धावली. हा 15 स्पॅनचा पूल असून प्रत्येकाची लांबी 30.5 मीटर आहे. म्हणजेच जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा तर शंभर फूट उंचीचा हा पूल आहे.
 

Web Title: Munde sisters pankaja and pritam thanked Fadnavis, Devendra also appreciated the work of beed railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.