मढच्या समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या अनधिकृत स्टुडिओंवर पालिकेची तोडक कारवाई
By मनोहर कुंभेजकर | Published: April 7, 2023 12:39 PM2023-04-07T12:39:30+5:302023-04-07T12:40:42+5:30
२०२१ मध्ये सुमारे पाच लाख चौफूट जागेवर २२ स्टुडिओं बांधण्यात आले होते.
मुंबई- मालाड पश्चिम मढ हे चित्रपट व मालिकांच्या शुटिंग साठी प्रसिद्ध आहे.येथील मढ,भाटी ,एरंगळच्या समुद्रकिनारी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत आणि नो डेव्हलपमेंट झोन मध्ये २०२१ मध्ये सुमारे पाच लाख चौफूट जागेवर २२ स्टुडिओं बांधण्यात आले होते. या स्टुडिओं विरोधात पालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. तर काही स्टुडिओंची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. या प्रकरणी परिमंडळ ५ चे पालिका उपायुक्त हर्षद काळे यांची समिती देखिल पालिका प्रशासनाने नेमली होती.
राष्ट्रीय हरित लवादाने सदर स्टुडिओंवर कारवाई करा असा निकाल दिला होता. आज सकाळ पासून महापालिकेच्या परिमंडळ ४ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी या स्टुडिओंवर तोडक कारवाई सुरू केली.यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी जेसेबी मशीन आणि अन्य यंत्रसमुग्रीसह या स्टुडिओंवर हातोडा मारण्यास सुरवात केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.
मुंबई- मढच्या समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या अनधिकृत स्टुडिओंवर पालिकेने आज तोडक कारवाई केली. pic.twitter.com/xL6mM98kn5
— Lokmat (@lokmat) April 7, 2023