बेकायदा मजल्यांवर पालिकेची कारवाई
By Admin | Published: January 12, 2017 08:06 PM2017-01-12T20:06:02+5:302017-01-12T20:06:02+5:30
सांताक्रुज येथील कालीन परिसरात असलेल्या एका इमारतीचे पाच बेकायदा मजले महापालिका प्रशासनाने आज जमीनदोस्त केले. सात मजल्यांची परवानगी असताना विकासकाने
>मुंबई, दि. 12 - सांताक्रुज येथील कालीन परिसरात असलेल्या एका इमारतीचे पाच बेकायदा मजले महापालिका प्रशासनाने आज जमीनदोस्त केले. सात मजल्यांची परवानगी असताना विकासकाने चक्क या ठिकाणी १२ मजल्यांची इमारत तयार झाली होती. पाडण्यात आलेल्या मजल्यांवरील दोन फ्लॅट काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या मुलाचे आहे. त्यावरही पालिकेने कारवाई केली.
कालीन परिसरात असलेल्या अवधूत नावाची १२ मजल्यांची इमारत आहे. या सात मजल्यांना सी.सी. (बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र) आहे. मात्र विकासकाने यावर आणखी पाच मजले चढवले. या बेकायदा मजल्यांवरील फ्लॅटची विक्रीही झाली. प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. यापैकी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचे पुत्र संजय सिंह यांचे दोन फ्लॅट आहेत. त्यांच्या फ्लॅटवर सुद्धा पालिकेच्या प्रशासनाने कारवाई झाली.
हे बेकायदा मजले पडण्याची नोटीस पालिकेने विकासकाला पाठवली होती. मात्र विकासकाने शहर दिवाणी न्यायालय व त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे पालिकेच्या बाजूने कौल लागल्याने त्यानुसार आज कारवाई करण्यात आली. बेकायदा मजल्यांवरील प्रत्येक फ्लॅटच्या शौचालयाचे दरवाजे काढण्यात आले. तसेच हे फ्लॅट्स राहण्यास अयोग्य करण्यात आले आहेत.