४०६ स्टॉल्सवर पालिकेची कारवाई

By admin | Published: December 4, 2015 02:04 AM2015-12-04T02:04:11+5:302015-12-04T02:04:11+5:30

पालिकेने दोन दिवस के/पश्चिम व एच/पश्चिम विभागांमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यामध्ये ज्या स्टॉलधारकांनी त्यांना मंजूर असलेल्या क्षेत्रफळापेक्षा

Municipal action taken on 406 stalls | ४०६ स्टॉल्सवर पालिकेची कारवाई

४०६ स्टॉल्सवर पालिकेची कारवाई

Next

मुंबई : पालिकेने दोन दिवस के/पश्चिम व एच/पश्चिम विभागांमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यामध्ये ज्या स्टॉलधारकांनी त्यांना मंजूर असलेल्या क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा व्यापून केलेले अतिक्रमण हटविले. या अंतर्गत एच/पश्चिम विभागामध्ये २५२ स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली, तर के/पश्चिम विभागामध्ये १५४ स्टॉल्सवर कारवाई केली. अतिरिक्त बांधकाम, मंजूर जागेबाहेर बांबू-ताडपत्री-सिमेंटचे पत्रे लावून केलेले अतिक्रमण हटविले आहे. त्याचबरोबर स्टॉल्सच्या समोरील बाजूस झडपा, प्रोजेक्शन बाहेर काढलेले होते, त्यावरही कारवाई करण्यात आली. कारवाईत जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या गोदामात जमा करण्यात आले आहे.

Web Title: Municipal action taken on 406 stalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.