महापालिकेचा अर्थसंकल्प : नव्या आर्थिक वर्षात जुन्या प्रकल्पांनाच प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:33 AM2018-01-30T07:33:59+5:302018-01-30T07:34:17+5:30
वास्तवदर्शी अर्थसंकल्पाचा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा करीत, आगामी आर्थिक वर्षातही आवश्यक त्याच प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात ना नवीन घोषणा ना करवाढ प्रस्तावित करणारा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.
मुंबई : वास्तवदर्शी अर्थसंकल्पाचा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा करीत, आगामी आर्थिक वर्षातही आवश्यक त्याच प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात ना नवीन घोषणा ना करवाढ प्रस्तावित करणारा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्यामुळे, विकास कामांच्या निधीसाठी पालिकेची तारेवरची कसरत या अर्थसंकल्पात दिसून येणार आहे.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त अजय मेहता यांनी आकडे फुगविण्याऐवजी, आवश्यक त्याच प्रकल्पांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे सन २०१६-२०१७ मध्ये ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प थेट २५ हजार १४१ कोटींवर आणण्यात आला. मात्र, जीएसटी आणि सॅप प्रणालीमुळे विकासाची कामे गेले काही महिने ठप्प राहिली. परिणामी, अर्थसंकल्पातील ६० ते ७० टक्के तरतूद वाया जाण्याची शक्यता आहे.
मात्र, गेल्या आर्थिक वर्षात केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने, या वर्षी विकास कामांवरील ३५ टक्के खर्च निश्चितच चांगला असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात एक ते दीड हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. सध्या काम सुरू असलेल्या प्रकल्पांचे लक्ष्य समोर ठेवून, ते प्रकल्प मार्गी लावण्यावर येत्या आर्थिक वर्षात पालिकेचा भर असणार आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या सागरी मार्ग आणि गोरेगाव जोगेश्वरी जोड रस्ता या प्रकल्पांचा समावेश असणार आहे.
अशा काही तरतुदी
च्तानसा जलवाहिनीजवळ सायकलिंग ट्रॅक च्कफ परेड येथे ३०० एकरवर सेंट्रल पार्क च्पूर्व व पश्चिम उपनगरात क्रीडा संकुल च्भूमिगत वाहनतळ च्सागरी मार्ग आणि गोरेगाव मुलुंड जोड रस्ता
सागरी मार्ग प्रकल्पावर एप्रिलमध्ये काम सुरू होणार
महत्त्वाकांक्षी सागरी मार्ग प्रकल्पावर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये काम सुरू होणार आहे.
पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनेनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अभ्यासासाठी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प विलंबाने सुरू होणार आहे.
तानसा जलवाहिनीच्या परिसरात सायकलिंग ट्रॅक, ब्रिमस्टोवड, मुलुंड-कांजूरमार्ग कचराभूमीत कचºयापासून वीजनिर्मिती, देवनार कचराभूमी बंद करणे या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे.
चांगले नियोजन आणि नियमित आढावा, यामुळे अर्थसंकल्पातील तरतूद विकास कामावर खर्च होण्याचे प्रमाण सुधारले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष अखेरीस ४५ टक्के रक्कम विकास कामावर खर्च होणार आहे.