दि म्युनिसिपल को-आॅप. बँकेचा गौरव

By Admin | Published: May 7, 2017 06:35 AM2017-05-07T06:35:49+5:302017-05-07T06:35:49+5:30

मुंबई महापालिकेच्या दि म्युनिसिपल को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेला शासनाच्या ‘सहकार भूषण’ या पुरस्काराने राज्यपाल विद्यासागर

The municipal co-op Bank's pride | दि म्युनिसिपल को-आॅप. बँकेचा गौरव

दि म्युनिसिपल को-आॅप. बँकेचा गौरव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या दि म्युनिसिपल को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेला शासनाच्या ‘सहकार भूषण’ या पुरस्काराने राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बँकेचे कार्याध्यक्ष आणि महापालिकेच्या शिक्षण खात्याचे उपायुक्त मिलिन सावंत व बँकेच्या संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. राज्यातील पुरस्कारपात्र सहकारी संस्थांची अंतिम निवड करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने बँकेस काही महत्त्वाच्या निकषांमध्ये उत्तम कामगिरीसाठी जास्तीतजास्त गुण दिले. दि म्युनिसिपल को-आॅपरेटिव्ह बँकेची राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांमधून ‘सहकार भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दि म्युनिसिपल को-आॅपरेटिव्ह बँक महानगरपालिका कर्मचाऱ्यांची बँक असून, ८६ हजार ४५२ महापालिका कर्मचारी बँकेचे सभासद आहेत कोअर बँकिंग, आर.टी.जी.एस. इत्यादी सुविधा बँक देते. बँकेची मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी १० ए.टी.एम. केंद्रे आहेत. बँकेने मोबाइल बँकिंग सेवा सुरू केली आहे. या बँकेने एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: The municipal co-op Bank's pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.