तातडीने खड्डे भरा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, महापालिका आयुक्तांनी दिली ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:52 PM2020-08-19T16:52:47+5:302020-08-19T16:53:55+5:30

मागील काही दिवसापासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्याच्या मुद्यावरुन पालिका प्रशासनावर सपाटून टिका केली जात आहे. सोशल मिडियावर देखील शहरातील खड्यांवर कविता केल्या जात आहे. त्यानंतर बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांची पाहणी केली.

Municipal Commissioner Dr. Vipin Sharma inspects pits: If no action is taken, action will be taken against officers and contractors | तातडीने खड्डे भरा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, महापालिका आयुक्तांनी दिली ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना समज

तातडीने खड्डे भरा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, महापालिका आयुक्तांनी दिली ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना समज

googlenewsNext

ठाणे : संततधार पावसामुळे शहरात खड्डे पडल्याच्या तक्र ारी वाढल्याच्या पाशर््वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी शहरातील खड्ड्यांची पाहणी करून तातडीने खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दरम्यान खड्डे भरण्याचे काम सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशाराही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिला.
              मागील काही दिवसापासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सोशल मिडियावरही महापालिकेवर सपाटून टिका केली जात आहे. या टिकेनंतर बुधवारी सकाळपासूनच महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांची पाहणी करायला सुरूवात केली. या पाहणी दौºयातंर्गत त्यांनी दालिमल चौक येथील रस्त्यांची पाहणी करून एका बाजूचा राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. सदरचे काम आजच्या आज सुरू नाही झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.
दालिमल चौकानंतर महापालिका आयुक्तांनी एम्को कंपनी येथील रस्त्यांची पाहणी करून रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम तसेच चेंबर कव्हर्स तातडीने बसविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तीन हात नाका, कशीश पार्क, तसेच तीन हात नाका ते लुईसवाडी येथील सर्व्हिस रोडची पाहणी करून तेथील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले. यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे उपस्थित होते.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तीन हात नाका उड्डाण पुलावरी खड्ड्यांची पाहणी करून ते खड्डे तातडीने भरण्यासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दौºयात त्यांचे समवेत उप आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रविंद्र खडताळे, माहिती व जनसंपर्कअधिकारी महेश राजदेरकर, उपनगर अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Municipal Commissioner Dr. Vipin Sharma inspects pits: If no action is taken, action will be taken against officers and contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.