- मनोहर कुंभेजकरमुंबई - एकीकडे वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वळा सायकल कडे अशी मागणी जोर करू लागली आहे. लहानपणी पत्येकानी सायकल चालवली आहे. मात्र आज आपल्या व्यस्त दैनंदिन कामकाजात आज चक्क पालिका आयुक्त प्रवीण परदेशी व उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांनी सायकलवर स्वार होऊन मालाड पश्चिम मार्वे ते आकसा असा सुमारे 5 किमीचा प्रवास करून सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला.
प्रवीण परदेशी यांनी मालाडच्या विविध विकासाच्या प्रश्न सोडविण्यासाठी मालाडला भेट दिली.यावेळी खासदार गोपाळ शेट्टी व मालाडचे काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख आणि पालियज्ञ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी,खासदार शेट्टी व आमदार अस्लम शेख यांनी येथील विविध ठिकाणी भेट दिली आणि विविध समस्यांकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले.
पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अक्सा बीच भेट दिली आणि मढ जेट्टी ते मार्वे बीच पर्यंत समुद्रकिनारे स्वच्छतेसाठी अतिरिक्त कामगारांच्या नेमणूकीचे आदेश आयुक्तांनी दिले.गणपती विसर्जन आणि टॉयलेट्सची अनावश्यक वस्तू व इतर सुविधांची पूर्तता करण्याच्या तयारीसाठी मारवे बीच येथे भेट दिली.तर मार्वे बीचवर गणपती विसर्जनाच्या सुविधांची त्यांनी पाहणी केली तर येथे शौचालयाची व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
यावेळी दानापाणी पूलाचे रूंदीकरण करून दोन लेन पूल बनविणे तसेच नवीन सीवरेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करण्यासाठी लागून रोडवर वॉटर ट्रीटमेंट प्लांटला देखिल या मान्यवरांनी भेट दिली.तसेच इनॉर्बिट मॉल व्यतिरिक्त भूमिगत पार्किंग पुरवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले.
तर मार्वे रोड रूंदीकरणामुळे प्रभावित लोकांचे पुनर्वसन करण्याची पालिका आयुक्तांना केली असता त्यांनी पीडित लोकांना वैकल्पिक अभिप्राय देण्यास सांगितले.
एकंदरीत आयुक्तांच्या भेटी मुळे मालाडच्या विविध भागांतील समस्या लवकर मार्गी लागतील असा विश्वास शेवटी खासदार गोपाळ शेट्टी व आमदार अस्लम शेख यांनी शेवटी व्यक्त केला.