मुंबईतील गृहनिर्माण परवानग्यांसाठी पालिका आयुक्त, सचिवांची समिती - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 06:40 AM2020-01-22T06:40:07+5:302020-01-22T06:40:25+5:30

अनेकवेळा गृहनिर्माणविषयक मान्यता, पर्यावरणविषयक मान्यता किंवा महापालिकेकडून मिळणा-या मान्यता वेळेत न मिळाल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडतात

Municipal Commissioner, Secretary's Committee for Housing Permits in Mumbai - Aditya Thackeray | मुंबईतील गृहनिर्माण परवानग्यांसाठी पालिका आयुक्त, सचिवांची समिती - आदित्य ठाकरे

मुंबईतील गृहनिर्माण परवानग्यांसाठी पालिका आयुक्त, सचिवांची समिती - आदित्य ठाकरे

Next

मुंबई : मुंबई शहरामधील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पर्यावरणविषयक, गृहनिर्माणविषयक आणि महापालिकांकडून मिळणाऱ्या विविध परवानग्या जलदगतीने मिळण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त, गृहनिर्माण सचिव आणि पर्यावरण सचिव यांची समिती गठीत करण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत स्वमालकीच्या घरात राहण्याचे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. यासाठी लोक मोठी गुंतवणूक करतात. पण अनेकवेळा गृहनिर्माणविषयक मान्यता, पर्यावरणविषयक मान्यता किंवा महापालिकेकडून मिळणा-या मान्यता वेळेत न मिळाल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडतात. अनेकवेळा एखाद्या विभागाची मान्यता मिळाली तर दुसºया विभागाची मान्यता रखडलेली असते. गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मान्यता समांतरपणे मिळण्याच्या दृष्टीने शासनाच्या ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’च्या धोरणांतर्गत ही समिती नेमण्यात येत आहे. जे गृहनिर्माण प्रकल्प विविध आवश्यक निकषांची पूर्तता करतील त्यांना जलदगतीने मान्यता देण्याच्या दृष्टीने ही समिती काम करेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Municipal Commissioner, Secretary's Committee for Housing Permits in Mumbai - Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.