Join us

१४ दिवस पाणी जपून वापरा... खार, वांद्र्यातील नागरिकांना महानगरपालिकेचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 9:41 AM

वांद्रे एच- पश्चिम परिसरात पाली हिल जलाशयाच्या जुन्या मुख्य जलवाहिनीचे पुनर्वसन आणि सशक्तीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

मुंबई : वांद्रे एच- पश्चिम परिसरात पाली हिल जलाशयाच्या जुन्या मुख्य जलवाहिनीचे पुनर्वसन आणि सशक्तीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे वांद्रे, खार परिसरात २७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत १४ दिवस पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. काही जलवाहिन्यांच्या पुनर्बांधणीची कामे केली जात आहेत.

१) १०% हाेणार पाणीकपात  

२) ११ मार्चनंतर पाणीपुरवठा पूर्ववत 

३) पाली हिल जलाशयाच्या जुन्या मुख्य जलवाहिनीचे पुनर्वसन

४) काही जलवाहिन्यांच्या पुनर्बांधणीची कामे हाेणार.

५) ७ फेब्रुवारी ते  ११ मार्च या  कालावधीत  पाणीपुरवठ्यात  कपात 

एच पश्चिम  विभाग - 

१) दुरुस्तीच्या कामादरम्यान येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.  एच-पश्चिम प्रभागातील वांद्रे, खार येथील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठ्यामध्ये १४ दिवस १० टक्के कपात करण्यात येणार आहे. 

२) ११ मार्चनंतर संबंधित परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

३) दुरुस्तीच्या कामादरम्यान येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

४)  एच-पश्चिम प्रभागातील वांद्रे, खार येथील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठ्यामध्ये १४ दिवस १० टक्के कपात करण्यात येणार आहे. 

५) ११ मार्चनंतर संबंधित परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणी टंचाई