CoronaVirus: पालिका, बेस्टच्या ५५ वर्षांवरील कामगारांना घरी थांबण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:13 AM2020-04-30T06:13:14+5:302020-04-30T06:13:35+5:30

याच धर्तीवर ५५ वर्षांवरील पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनाही घरी थांबू द्या, अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती.

Municipal Corporation, BEST workers above 55 years of age ordered to stay at home | CoronaVirus: पालिका, बेस्टच्या ५५ वर्षांवरील कामगारांना घरी थांबण्याचे आदेश

CoronaVirus: पालिका, बेस्टच्या ५५ वर्षांवरील कामगारांना घरी थांबण्याचे आदेश

Next

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका ५५ वर्षांवरील व्यक्तींना अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे आदेश पोलीस खात्याने दिले होते. याच धर्तीवर ५५ वर्षांवरील पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनाही घरी थांबू द्या, अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे सुमारे साडेपाच हजार रुग्ण सापडले असून यापैकी अडिचशे लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५५ वर्षांवरील व्यक्तीची संख्या अधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पालिकेने यापूर्वीच केले आहे.
मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार असा त्रास असलेल्या ज्येष्ठांची तपासणी सुरू आहे. तसेच ५२ वर्षे वय असलेल्या आणि मधुमेह, हायपरटेन्शन असे दीर्घ आजार असल्यास त्यांनीही कामावर न येता घरीच थांबावे असे आदेश आयुक्तांनी दिले.

Web Title: Municipal Corporation, BEST workers above 55 years of age ordered to stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.