मुंबई : वर्साेवा चौपाटीचा मुद्दा गाजल्यानंतर, महापालिकेने मुंबईतील सर्वच चौपाट्यांच्या सफाईला प्राधान्य देण्याचे निश्चित केले आहे. भरतीच्या काळात समुद्रकिनाºयांची कचराकुंडी होते. मात्र, चौपाटीची सफाई करणारे ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा तक्रारी आल्यानंतर चौपाट्यांच्या सफाईत कामचुकारपणा करणाºया ठेकेदारांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.जुहू व वर्सोवा चौपाटीच्या सफाईचे कंत्राट देताना, ठेकेदारांसाठी कडक नियमावली तयार केली आहे. नवीन नेमलेल्या ठेकेदाराला चौपाटीच्या सफाईचे एक वर्षाचे कंत्राट मिळाले आहे. पुढच्या वर्षी या कंत्राटाची मुदत संपणार आहे. मात्र, ही मुदत संपल्यानंतर नवीन ठेकेदार नेमण्यात येईल, याची हमी प्रशासनाने दिली आहे. आवश्यकतेनुसार कामगारांची संख्या वाढवण्याची सूट ठेकेदारांना दिली आहे.जुहू चौपाटीवर २० आणि वर्साेव्याला १२ कामगारांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेनुसार वाढविता येईल. मात्र, जुहू येथे रेतीतून कचरा वेचणाºया एकूण तीन, तर वर्साेवा येथे दोन मशीन लावण्याची परवानगी आहे. चौपाट्या अस्वच्छ दिसल्यास, प्रत्येक पाचशे मीटरच्या अंतरासाठी पाचशे रुपये दंड ठोठाविण्यात येत आहे. मात्र, आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वेगळा दंड असणार आहे. हा दंड अधिक असल्याने ठेकेदार चौपाट्या स्वच्छ ठेवतील, असा विश्वास पालिका प्रशासनाला वाटत आहे.-वर्साेवा येथे सफाईसाठी १२ कामगार, तर जुहू चौपाटीवर २० कामगार नेमण्याची परवानगी आहे. कामगारांची संख्या गरजेनुसार ठेकेदारांना वाढविता येईल.- रेतीतून कचरा वेचणाºया सध्या दोन मशीन जुहूमध्ये आहेत. यात वाढ करून तीन, तर वर्साेव्यात एक मशीन आहे. त्यात वाढ करून दोन करण्यात येणार आहे.- सध्या प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर पाचशे रुपये दंड आहे. यात वाढ करून उन्हाळा व हिवाळ्यात शंभर मीटर अंतरासाठी एक हजार रुपये, तर त्यापुढे प्रत्येक शंभर मीटरसाठी आणखी एक हजार रुपये दंड असणार आहे. पावसाळ्यात हा दंड आणखी वाढेल.
चौपाट्यांच्या सफाईत दुर्लक्ष पडणार महागात, ठेकेदारांवर कारवाईचा बडगा, महापालिकेने कडक नियमावली केली तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:57 AM