अभिनेता सोनू सूदविरोधात पालिकेची पोलिसांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:27+5:302021-01-08T04:17:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निवासी इमारतीचे बेकायदेशीरपणे हाॅटेलमध्ये रूपांतर केल्याप्रकरणी अभिनेता सोनू सूद याच्याविरोधात पालिका प्रशासनाने जुहू पोलीस ...

Municipal Corporation lodges complaint against actor Sonu Sood with police | अभिनेता सोनू सूदविरोधात पालिकेची पोलिसांकडे तक्रार

अभिनेता सोनू सूदविरोधात पालिकेची पोलिसांकडे तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : निवासी इमारतीचे बेकायदेशीरपणे हाॅटेलमध्ये रूपांतर केल्याप्रकरणी अभिनेता सोनू सूद याच्याविरोधात पालिका प्रशासनाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री कंगना रानौत हिच्या वांद्रे येथील कारवाईने अडचणीत आलेल्या महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

सोनू सूदने जुहू येथील ए.बी. नायर रोडवरील ‘शक्ती सागर’ या सहा मजली इमारतीचे रूपांतर हॉटेलमध्ये केले आहे. मात्र यासाठी आवश्यक कोणतीही परवानगी सोनू यांनी घेतलेली नाही, अशी तक्रार महापालिकेने केली आहे. याबाबत नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत बांधकाम सुरूच ठेवले, अशी पालिकेची तक्रार आहे. मात्र जागेच्या वापरात बदल करण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या महापालिकेकडून घेण्यात आल्या आहेत. आता केवळ महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचा बचाव सूद यांनी केला आहे.

सोनू याने लॉकडाऊनच्या काळात ‘कोविड योद्ध्यां’च्या राहण्याची व्यवस्था या हॉटेलमध्ये केली होती. मात्र निवासी इमारतीचा बेकायदेशीर बदल करून सुरू केलेल्या हॉटेलला महापालिकेने ऑक्टोबर २०२० मध्ये नोटीस दिली होती. याविरोधात सोनू यांनी शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार उच्च न्यायालयात याचिका करण्यासाठी त्याला वेळ मिळाला होता, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने निदर्शनास आणले.

Web Title: Municipal Corporation lodges complaint against actor Sonu Sood with police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.