Join us

अखेर लिपिक पदासाठी पालिकेची नव्याने जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 9:11 AM

प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही

मुंबई : पालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) या संवर्गातील १,८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविली जात आहे.

या भरतीसाठी दहावी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे ही अट होती. मात्र 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर पालिकेने 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द केली. त्याचप्रमाणे पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील '४५ टक्के' ही अटसुद्धा रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, आता सुधारित अर्हतेनुसार अर्ज मागविण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन जाहिरातीनुसार, इच्छुकांना ११ ऑक्टोबरपर्यंत नवीन अर्ज करता येणार आहे. याआधी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

आरक्षित वर्गासाठीची पदे... 

विविध खात्यांच्या गट 'क' मधील सुधारित वेतनश्रेणीतील 'कार्यकारी सहायक' या संवर्गातील १,८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे ही भरती होईल.

टॅग्स :मुंबईनोकरी