Join us

नववर्षात महापालिकेचा रुग्णांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 2:46 AM

दवाखाने सकाळी ८ वाजता उघडणार; संध्याकाळीही मिळणार उपचार

- शेफाली परब-पंडित मुंबई : पालिकेचे दवाखाने दुपारी बंद होत असल्याने खासगी उपचार घ्याव्या लागणाऱ्या गरीब रुग्णांना नवीन वर्षात दिलासा मिळणार आहे. सकाळी ९ ऐवजी पालिकेचे दवाखाने आता ८ वाजताच उघडणार आहेत. एवढेच नव्हे, तर सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेतही दवाखाने खुले राहणार आहेत. त्यामुळे कामावरून आल्यानंतरही मुंबईकरांना येथे उपचार घेता येणार आहेत. हातावर पोट असणाºया गरजू रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून निवडक १५ दवाखाने संध्याकाळीही खुले राहणार आहेत.नोकरदारांच्या सुविधेसाठी पालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर दुसºया सत्रात संध्याकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत दवाखान्यात रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून निवडक १५ दवाखाने संध्याकाळचे सुरू राहणार आहेत. यासाठी मंजुरी घेण्यात आली असल्याने दवाखाने संध्याकाळचे सुरू होतील, असे उपायुक्त सुनील धामणे यांनी सांगितले.१५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीनव्या वेळेत दवाखाने चालवण्यासाठी मे. रुबी अलकेअर सर्व्हिसेस लि. कंपनीला कंत्राट दिले आहे.दोन वर्षांच्या कामाकरिता वैद्यकीय अधिकाºयांना प्रतिमहा ६० हजार रुपये तर बहुउद्देशीय कामगारांना प्रतिमहा १७,५०० रुपये मानधन मिळणार आहे.उपरोक्त दवाखान्यांमध्ये दोन वर्षांसाठी १५ वैद्यकीय अधिकारी व १५ बहुउद्देशीय कामगारांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येईल.दोन वर्षांचा एकूण खर्च दोन कोटी ७९ लाख रुपये इतका करण्यात येणार आहे.हे आहेत ते दवाखानेए विभाग - कुलाबा म्युनि. दवाखानाबी विभाग - वालपाखाडी दवाखानाडी विभाग - बाने कंपाउंड दवाखानाई विभाग - साऊटर स्ट्रीट दवाखानाएफ/नॉर्थ - रावळी कॅम्प, वडाळा दवाखानाजी/साऊथ - बीडीडी चाळ दवाखानाएच/ईस्ट - कलिना दवाखानाएच/वेस्ट - ओल्ड खार दवाखानाके/वेस्ट - एन. जे. वाडिया दवाखानापी/नॉर्थ - चौक्सी दवाखानाआर सेंट्रल - गोराई म्हाडा दवाखानाएल विभाग - चुनाभट्टी दवाखानाएन विभाग - रमाबाई आंबेडकर दवाखानाएस विभाग- कांजूर व्हिलेज दवाखाना

टॅग्स :मुंबई महानगरपालिका