लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेने या वर्षीही नागरी सेवा-सुविधांमध्ये वाढ केली आहे. ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात येणार्या विविध सेवा-सुविधांबाबत प्रशासन सुसज्ज असल्याची माहिती आयुक्त अजय मेहता यांनी दिली. मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यालयात महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, एमएमआरडीए, पोलीस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल तसेच विविध सामाजिक संघटना यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती, या वेळी मेहता बोलत होते.संबंधित संस्थांच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांची पड ताळणी करून त्या अमलात आणण्यासाठी त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मेहता या वेळी म्हणाले. शिवाजी पार्क परिसरात स्वच्छ तेच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाकडे याही सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनातर्फे तयारी सुरू आहे. मेहता यांनी सांगितले की, बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येणारा अनुयायी शिस्तबद्ध असतो. तेव्हा प्र त्येक ५0 मीटर अंतरावर कचराकुंडी ठेवण्यात यावी. स्वच्छतेच्या अनुषंगाने सुमारे १५३५ कर्मचार्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहतील. कर्मचार्यांवर ताण पडू नये यासाठी सफाई कर्मचार्यांची कामाची वेळ आठ तासांवरून सहा तास केली आहे. समुद्रकिनारी बोटी तैनात ठेवणे, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासोबत राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या ठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
चैत्यभूमीवर सुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:32 AM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेने या वर्षीही नागरी सेवा-सुविधांमध्ये वाढ केली आहे. ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात येणार्या विविध सेवा-सुविधांबाबत प्रशासन सुसज्ज असल्याची माहिती आयुक्त अजय मेहता यांनी दिली.
ठळक मुद्देमहापरिनिर्वाण दिन चोख व्यवस्था ठेवणार