Join us

तरण तलाव अखेर महापालिकेकडेच!

By admin | Published: June 27, 2014 11:40 PM

देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक होऊ लागल्याने आता ठाणो महापालिकेने तरण तलावांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

ठाणो : देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिक होऊ लागल्याने आता ठाणो महापालिकेने तरण तलावांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेचा हा प्रस्ताव फेटाळला असून, प्रथम चांगल्या सुविधा द्या मगच शुल्कात वाढ करा, अशी त्यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. यापुढे हे तरण तलाव महापालिकेनेच चालवावेत, अशी सूचनाही सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली.  
ठाणो महापालिकेचे मारोतराव शिंदे, कळव्यात कै. यशवंत रामा साळवी असे दोन तरण तलाव आहेत. 2क्क्9मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तरण तलाव शुल्काचे दर निश्चित करण्यात आले होते. मात्र, या दरातून मिळणारे उत्पन्न तलावांच्या देखभालीसाठी तुटपुंजे ठरू लागले आहे. वार्षिक उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत वाढतच आहे. तलावांची निगा व देखभाल, दुरुस्ती, कर्मचा:यांचे वेतन, साधनसामग्री आणि किरकोळ गोष्टींवर होणारा खर्च दुपटीने वाढलेला असताना त्या मानाने उत्पन्नामध्ये वाढ होत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. 
 
च्तरण तलावांचा खर्च पेलताना महापालिकेस तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर मनपाने या दोनही तरण तलावांच्या शुल्क दरात वाढ करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार 2क्14 आणि 15 या दोन्ही आर्थिक वर्षासाठी अनुक्रमे 1क् ते 15 टक्के दरवाढ करण्याचे सुचविले आहे.