महापालिकेची अतिक्रमणवर कारवाई, कनिष्ठ अभियंता व बिट निरीक्षकना ठरवणार जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 03:56 PM2021-07-09T15:56:07+5:302021-07-09T15:57:33+5:30

गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम यांनी दोन मजल्याचे अनाधिकृत बांधकाम उध्वस्त केले.

Municipal Corporation will take action on encroachment, junior engineer and bit inspector will be responsible | महापालिकेची अतिक्रमणवर कारवाई, कनिष्ठ अभियंता व बिट निरीक्षकना ठरवणार जबाबदार

महापालिकेची अतिक्रमणवर कारवाई, कनिष्ठ अभियंता व बिट निरीक्षकना ठरवणार जबाबदार

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण साठी कनिष्ठ अभियंता, बिट निरीक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित केली असून गेल्या दोन दिवसात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनाधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत उपायुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील अनाधिकृत बांधकामे, फेरीवाले, गॅरेज, पदपथावरील व्यावसायिक, अनाधिकृत होर्डिंग्ज यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे प्रभागातील अनाधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.

गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम यांनी दोन मजल्याचे अनाधिकृत बांधकाम उध्वस्त केले. प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी एका जीन्स फॅक्टरी व शूटर स्नूकरचे अवैध शेड तोडले. प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांनी काशिमीरा जकात नाका, डायमंड टॉवर इमारती लगत मोकळ्या जागेत असलेल्या बांबु ताडपत्री व लोखंडी अँगल व पत्र्याच्या सहाय्याने केलेल्या ३ अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम तोडले. डाचकुलपाडा येथे असलेले २ खोल्यांचे  अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. काशीमीरा पुलाखाली असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली अनाधिकृत फेरीवाल्यांवर तर प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांच्या पथकाने अनधिकृत जाहिरात फलक वर कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्त मुठे यांनी दिले आहेत.
 

Web Title: Municipal Corporation will take action on encroachment, junior engineer and bit inspector will be responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.