पाणीपुरवठ्यासाठी पालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Published: March 8, 2016 02:48 AM2016-03-08T02:48:09+5:302016-03-08T02:48:09+5:30

पाणीकपातीमुळे धरणांमध्ये राखीव जलसाठ्याची बचत झाली आहे़ त्यामुळे वर्षभर पाण्यासाठी वणवण करणारी डोंगराळ भागातील वस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरांना प्रशासन लवकरच

Municipal Corporation's 'Action Plan' | पाणीपुरवठ्यासाठी पालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

पाणीपुरवठ्यासाठी पालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Next

मुंबई: पाणीकपातीमुळे धरणांमध्ये राखीव जलसाठ्याची बचत झाली आहे़ त्यामुळे वर्षभर पाण्यासाठी वणवण करणारी डोंगराळ भागातील वस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरांना प्रशासन लवकरच दिलासा देणार आहे़ आपल्या वॉर्डातील अशा वस्तींची यादी तयार करून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत़
पालिकेने २० टक्के पाणीकपात केल्यामुळे मर्यादित जलसाठ्यातही पालिकेला धरणांमधील राखीव साठा उचलावा लागला नाही़ त्यामुळे आपल्या वॉर्डातील रहिवाशांना गरजेनुसार पाणीपुरवठा होण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आराखडा तयार करणार आहेत़ हा प्लॅन तयार करण्याबरोबरच जल अभियंता खात्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून, पाणी बचतीचे मार्ग अवलंबिण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे़ गळती निदान कक्षाबरोबर समन्वय साधून, पावसाळ्यापूर्वी आपल्या वॉर्डातील गळती दुरुस्त करून घेण्यास सहायक आयुक्तांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)
गेल्या वर्षी अडीच हजार बेकायदा जलजोडण्या नागरिकांच्या तक्रारींनुसार तोडण्यात आल्या़
जल अभियंता खात्यातील अभियंत्यांबरोबर जलसाठ्याचा आढावा घेऊन जलवहिन्यांच्या स्थितीबाबत अहवाल तयार होणार आहे़ यामध्ये पाण्याचा दाब अथवा पाण्याची वेळ बदलण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़
प्रमुख धरणांमध्ये सध्या पाच लाख ३४ हजार ७५३ दशलक्ष लीटर्स जलसाठा आहे़ हा साठा मागच्या वर्षीच्या तुलनेत एक लाख दशलक्ष लीटर्सने कमी आहे़
पावसाळ्यापर्यंत १४७ दिवस पाण्याची गरज आहे़ यासाठी सात धरणांमधील ५० टक्के राखीव साठा वापरावा लागणार आहे. याबाबत १५ जूननंतर निर्णय होईल.

Web Title: Municipal Corporation's 'Action Plan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.