धारावीकरांच्या तोंडचे पाणी पळणार, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
By जयंत होवाळ | Published: April 15, 2024 07:38 PM2024-04-15T19:38:44+5:302024-04-15T19:39:08+5:30
जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी १८ व १९ एप्रिल रोजी काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबई : उन्हाळा दिवसेंदिवस कडक होता असताना धारावीकरांच्या मात्र तोंडचे पाणी पळणार आहे. जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी १८ व १९ एप्रिल रोजी काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड येथे २४०० मिली मीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीच्या जोडणीचे काम १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून १९ एप्रिल पहाटे ४ वाजेपर्यंत (एकूण १८ तासांसाठी) हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
- १०० टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग
१. एच पूर्व विभाग - वांद्रे रेल्वे टर्मिनस व वांद्रे स्थानक परिसर (१८ व १९ एप्रिल )
२. जी उत्तर – धारावी लूप मार्ग, नाईक नगर, प्रेम नगर (१८ एप्रिल रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)
३. जी उत्तर – धारावी लूप मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग (१८ एप्रिल रोजी धारावी येथील सायंकाळचा पाणीपुरवठा)
-२५ टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग
१. जी उत्तर – ६० फुटी रोड, शीव-माहीम लिंक रोड, ९० फुटी रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कया मार्ग, ए. के. जी. नगर, एम. पी. नगर (१८ एप्रिल रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)