Join us

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 11:00 PM

विलेपार्लेतील नामांकित नानावटी रुग्णालयावर पालिकेने कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

ठळक मुद्देरुग्णालयाकडून पीपीई किट्स, औषधं आणि कोरोना चाचणीसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात होते, असे सांगितले जात आहे. रुग्णालयाकडून याबाबतचा तपास सुरू आहे. अनेक खासगी रुग्णालयांत रुग्णांची लूट सुरू असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून पालिकेकडून रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मात्र, अनेक खासगी रुग्णालयांत रुग्णांची लूट सुरू असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यात पालिकेने आता यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.विलेपार्लेतील नामांकित नानावटी रुग्णालयावर पालिकेने कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. विलेपार्लेतील नानावटी रुग्णालयाविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतला आहे. कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरोगावार यांनी सांगितले की, १ जुलै रोजी रामचंद्र कोब्रेकर  (पालिका के - वेस्टचे अधिकारी) यांनी नानावटी विरोधात गुन्हा दाखल केली आहे. रुग्णालयाकडून पीपीई किट्स, औषधं आणि कोरोना चाचणीसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात होते, असे सांगितले जात आहे. रुग्णालयाकडून याबाबतचा तपास सुरू आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

टॅग्स :नगर पालिकापोलिसहॉस्पिटल