महापालिकेची दिवाळी आदिवासी पाड्यांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 06:14 PM2020-11-17T18:14:06+5:302020-11-17T18:14:25+5:30

Diwali on tribal padas : ६ वर्षांपासून परंपरा कायम

Municipal Corporation's Diwali on tribal padas | महापालिकेची दिवाळी आदिवासी पाड्यांवर 

महापालिकेची दिवाळी आदिवासी पाड्यांवर 

Next


मुंबई : कापूरबावडी स्थित आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत उपजल अभियंता (प्रचालने) या कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारीवृंद यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी सण साजरा केला. 

सावरकूट, कोचाळे, विहिगाव तसेच जवळच्या इतर पाड्यावरील आदिवासी बांधवांना अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून फराळ वाटप करण्यात आले. मागील सलग ६ वर्षांपासून या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम ठेवली आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कापूरबावडी येथील जल खात्यातील सर्व आजी-माजी कर्मचाऱ्यांनी आर्थिक हातभार लावला. खरोखर बंधने माणसाला असतात, माणुसकीला नाही, ही उक्ती सार्थ ठरवत गत ६ वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे सुरु आहे.
 

Web Title: Municipal Corporation's Diwali on tribal padas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.