Join us

मनपा अधिका:यांची माघार

By admin | Published: June 29, 2014 1:18 AM

स्थायी समितीमध्ये शिवसेना नगरसेवकाने आयुक्तांना अपशब्द वापरल्यामुळे अधिकारी संघटनेने सर्व सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये शिवसेना नगरसेवकाने आयुक्तांना अपशब्द वापरल्यामुळे अधिकारी संघटनेने सर्व सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. माफी मागेर्पयत बहिष्कार सुरू ठेवला जाण्याची गजर्ना केली होती. परंतु दोन सभांनंतर अधिका:यांनी माघार घेतली आहे. 
सभापती नियुक्तीनंतर स्थायी समितीच्या पहिल्याच सभेमध्ये शिवसेना नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी कामे होत नसल्यामुळे आयुक्तांना उद्देशून अपशब्द वापरला होता. यामुळे आयुक्तांसह सर्व अधिका:यांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. नंतरच्या स्थायी समिती सभेवर महापालिका अधिकारी संघटनेने बहिष्कार टाकला. सर्वसाधारण सभेसही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. जोर्पयत आयुक्तांची माफी मागितली जात नाही तोर्पयत सभेस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. विठ्ठल मोरे यांनीही माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. मी उद्गारलेले शब्द कामकाजातून काढून टाकले आहेत. हे शब्द  राष्ट्रवादीचे नेते यांनी राज्य सरकारच्या कामकाजासाठी मुख्यमंत्र्यांना उद्देशून वापरले होते. 
ते असंसदीय नसून माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले 
होते. 
सेना नगरसेवक व प्रशासनामधील वाद चिघळण्याची शक्यता असताना अधिकारी संघटनेने या वादातून माघार घेतली आहे. पालकमंत्री गणोश नाईक यांनी संघटनेच्या पदाधिका:यांची बैठक घेवून जनतेच्या कामावर परिणाम होवू नये यासाठी बहिष्कार मागे घ्यावा, पुन्हा असे प्रकार होणार नाहीत यासाठी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे जनहित लक्षात घेवून माघार घेतल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
 
शिवसेना नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी सांगितले की, हा विषय विनाकारण ताणून धरण्यात आला होता. माफी मागण्याचा प्रश्नच नसल्याचे मी स्पष्ट केले होते. अधिका:यांनी राजकीय भूमिका घेवू नये असे मतही व्यक्त केले होते. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. यामुळे आंदोलन नक्की कोणाच्या सांगण्यावरून केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.