चक्क बाईकवर स्वार होत पालिका उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांनी घेतला तिरंगा रॅलीत सहभाग

By मनोहर कुंभेजकर | Published: August 14, 2022 03:28 PM2022-08-14T15:28:11+5:302022-08-14T15:28:34+5:30

आर उत्तर वॉर्ड मध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून स्व.गोपीनाथ मुंडे शक्ति मैदानात 150 शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून डॉ. कापसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Municipal Deputy Commissioner Dr. Bhagyashree Kapse participated in the tricolor rally while riding a bike | चक्क बाईकवर स्वार होत पालिका उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांनी घेतला तिरंगा रॅलीत सहभाग

चक्क बाईकवर स्वार होत पालिका उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांनी घेतला तिरंगा रॅलीत सहभाग

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-गुढीपाडव्याला मुंबईसह,ठाणे,डोंबिवली आणि अन्य भागात भव्य शोभायात्रा काढण्यात येतात आणि यावर आपल्या पारंपरिक वेषात अनेक महिला बाईकवर स्वार होत
या शोभयात्रेत त्या सहभागी होतात. देशाच्या स्वातंत्त्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त परिमंडळ 7 येथील कांदिवली, बोरिवली व दहिसर विभागात लोकसभासगातून विविध उपक्रम राबवून घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रसार व प्रचार केला.यावेळी  मुंबई महानगर पालिकेच्या परिमंडळ 7 च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांनी चक्क बाईकवर स्वार झाल्या.त्यांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या या बाईक रॅलीला त्यांच्या चाहत्यांनीआणि येथील नागरिकांनी आणि येथील लोकप्रति निधींनी जोरदार दाद दिली आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

आर दक्षिण वॉर्डच्या सर्व खात्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कांदिवली पूर्व व पश्चिम परिसरात तिरंगा बाईक रॅली काढली होती.त्याचा शुभारंभ त्यांनी मी केला.मी मूळची नागपूरची असून मी त्यावेळी बाईक चालवत असे.आणि चक्क 20 वर्षांनी आता बाईक चालवली आणि
जुन्या आठवणींना उजाळा दिला अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.

मुंबई महानगर पालिकेच्या वतीने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या स्वातंत्त्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त परिमंडळ 7 मध्ये आर दक्षिण वॉर्ड,आर मध्य व आर उत्तर वॉर्डच्या सुमारे विविध भागात विविध उपक्रम राबवून घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रसार व प्रचार करण्यात येत असल्याची त्यांनी दिली.डॉ.भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर दक्षिण वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर,
आर मध्य वॉर्डचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती गोंधळी आणि आर उत्तर वॉर्डचे सहा. आयुक्त नयन वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या वॉर्ड मध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले.

या तिन्ही वॉर्डच्या इमारतीवर आणि विभागात सुमारे 50 ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.तर अनेक सेवाभावी संस्था,उद्योजक,शाळा,महाविद्यालय,मॉल्स,खाजगी हॉस्पिटल आणि अन्य ठिकाणी त्यांना प्रेरित करून या तिन्ही वॉर्ड मध्ये सुमारे 250 ठिकाणी अश्या एकूण 300 ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.

बोरिवली चिकू वाडीत बाईक व सायकल रॅली काढण्यात आली.आर मध्य वॉर्ड मध्ये रस्क्तदाब व मधुमेह शिबीराचे आयोजन करण्यात आले.आर उत्तर वॉर्ड आनंद नगर येथे स्ट्रीट प्ले,आर उत्तर वॉर्ड मध्ये उद्यान विमागाने भारताच्या नकाशाची तिरंगी प्रतिकृती फुग्यांवर साकारून फुगा आकाशात सोडला.

डॉ.कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर मध्य वॉर्डचे 
 सहाय्यक आयुक्त  निवृत्ती गोंधळी यांनी आर मध्य विभागात प्रवेशद्वारावर उद्यान विभागामार्फत लिंबू, मिरची, टोमॅटो ,भेंडी, गाजर, वांगे, लसूण इत्यादी फळभाज्या वापरून भारताच्या नकाशाची तिरंगी प्रतिकृती साकारली. तर  आर मध्य /आर उत्तर,  नियोजन विभाग  आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्ती गोंधळी आणि आर उत्तर वॉर्डचे सहा. आयुक्त नयन वेंगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

 येथील साहाय्यक आयुक्तांनी सर्व बचत गटांना प्रोत्साहित केले. आर उत्तर विभागात सुमारे 1.8 किमी दहिसर नदी परिसरात आयोजित रिव्हरथॉन रॅलीत येथील सर्व खात्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.आर उत्तर वॉर्ड मध्ये सखाराम तरे मार्ग येथील इंग्लिश एम पी एस शाळेत रांगोळी प्रदर्शन आयोजित केले होते.

आर उत्तर वॉर्ड मध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून स्व.गोपीनाथ मुंडे शक्ति मैदानात 150 शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून डॉ. कापसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आर दक्षिण विभाग गणेश नगर येथील एम.पी.एस.शाळेत हवेत तिरंग्याचा रंगाचा मोठा फुगा हवेत सोडण्यात आला.

Web Title: Municipal Deputy Commissioner Dr. Bhagyashree Kapse participated in the tricolor rally while riding a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.