पालिका कर्मचा:यांना 13 हजारांचा बोनस
By admin | Published: September 2, 2014 02:28 AM2014-09-02T02:28:14+5:302014-09-02T02:28:14+5:30
पालिका कर्मचा:यांना यंदाच्या दिवाळीला 13 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Next
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचारी वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. पालिका कर्मचा:यांना यंदाच्या दिवाळीला 13 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
महापालिका कर्मचारी वर्गासह शिक्षक आणि कंत्रटी कामगारांना देण्यात येणा:या सानुग्रह अनुदानात 5क्क् ते 15क् रुपयांची वाढ केली
आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याने महापालिका कर्मचारी वर्गाला देण्यात येत असलेल्या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय घेता यावा, म्हणून सोमवारी गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. महापालिका कर्मचारी वर्गाला गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्के वाढीव सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी गटनेत्यांनी केली होती. परंतु मालमत्ता करातून एक हजार कोटी रुपये एवढे कमी उत्पन्न मिळणार आहे. शिवाय जकातीचे उत्पन्न देखील पुरेसे नसल्याचे कारण पुढे करीत दहा टक्के वाढ देण्यास प्रशासनाने नकार दिला.
दरम्यान, या सानुग्रह अनुदानामुळे महापालिकेवर दीडशे कोटींचा बोजा पडणार असून, हे अनुदान ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी : 13 हजार. शिक्षक : 6 हजार 500. आरोग्यसेविका : 3 हजार 700. दत्तक वस्ती कर्मचारी : 2 हजार 15क्
गतवर्षी सानुग्रह अनुदानासाठी 143.71 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा 15क् कोटी सानुग्रह अनुदानासाठी खर्च करण्यात येणार आहेत.