मुंबई - मुंबई महापालिका कर्मचाºयांना लवकरच सातवा आयोग लागू करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू करण्याबाबत अनुकुलता दर्शविल्याचे शेवाळे यांनी सांगितले.पालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सुरू असलेल्या बैठकांमधून ठोस निर्णय होत नव्हता. या पार्श्वभूमीवर रविवारी जुन्या महापौर बंगल्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, शेवाळे यांच्यासह कामगार संघटना समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.शनिवारी आणि रविवार असे सलग दोन दिवस झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाने शिफारशींची अंमलबजावणी करण्यास अनुकुलता दर्शविली.सातव्या वेतन आयोगाची ३६ महिन्यांची थकबाकीही लवकरच अदा केली जाणार आहे. ५ फेब्रुवारी पासून याविषयीच्या सविस्तर बैठका आयुक्तांच्या दालनात घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, खंडित झालेली आरोग्य गटविमा योजनाही पुन्हा सुरू करण्याच्या सूचना ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग, समन्वय समितीच्या बैठकीत प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:10 AM