पालिका कर्मचा:यांची दिवाळी
By admin | Published: September 2, 2014 01:44 AM2014-09-02T01:44:24+5:302014-09-02T01:44:24+5:30
कामगारांच्या दिवाळी बोनसला आचारसंहितेचे विघ्न येऊ नये यासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.
Next
नवी मुंबई : कामगारांच्या दिवाळी बोनसला आचारसंहितेचे विघ्न येऊ नये यासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. कायम कामगारांना 14 हजार रुपये तर कंत्रटी कामगारांना 11 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या ठोक मानधनावरील कामगारांची यंदाची दिवाळी अधिकच सुखद जाणार आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर त्यांना दिल्या जाणा:या सानुग्रह अनुदानमध्ये महासभेने दुपटीने वाढ केली आहे. सोमवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीतर्फे कामगारांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्रशासनाच्या प्रस्तावित सानुग्रहमध्ये वाढ करुन स्थायी समितीने हा प्रस्ताव मांडला. त्यामध्ये कायम कामगारांना 13 हजार 4क्क् रुपये तर ठोक मानधनावरील कामगारांना 5 हजार 9क्क् रुपये सानुग्रह अनुदान प्रस्तावित होते. यावेळी महापौर सागर नाईक यांनी कायम कामगारांना 6क्क् रुपयांची तर ठोक मानधनावरील कामगारांना 51क्क् रुपयांची वाढ केली. महासभेच्या या निर्णयानुसार कायम कामगारांना 14 हजार रुपये तर ठोक मानधनावरील कामगारांना 11 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
सानुग्रह अनुदानामध्ये भरीव वाढ केल्यने कामगारांना गणोशोत्सवामध्येच दिवाळीचा आनंद झाला असून सर्वानी महापौरांसह सर्व नगरसेवकांचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)