Join us

देवनारमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना ‘आश्रय’; ४२४ घरांसाठी ४२१ काेटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 9:59 AM

देवनार येथे पालिका कर्मचाऱ्यांसाठी मुंबई महापालिका ७२४ घरे बांधणार आहेत.

मुंबई : देवनार येथे पालिका कर्मचाऱ्यांसाठी मुंबई महापालिका ७२४ घरे बांधणार आहेत. त्यासाठी ४१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ३०० ते ५०० चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार आहेत.

आश्रय  योजनेखाली पालिकेने  सफाई कामगारांसाठी घर बांधणी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यांच्यासह जल विभाग आणि आणि  अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी घरांची निर्मिती केली जाणार आहे. देवनार प्रकल्पात ६०० टेनमेंट या भूखंडावर ७२४ घरांचा प्रकल्प उभा राहणार आहे. त्या अंतर्गत २७ मजल्यांच्या दोन इमारती उभ्या राहतील. कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा, उद्यान तसेच पार्किंगची सुविधा  असेल. सीसीटीव्हीही बसवले जाणार आहेत. 

दादर, कुर्ल्यातही नियोजन :

सफाई कामगारांसाठी आतापर्यंत फक्त सहा हजार घरे उपलब्ध होती. आश्रय योजनेअंतर्गत २२ हजार घरे बांधली जाणार आहेत. याच योजनेअंतर्गत दादर आणि कुर्ला या भागातही घरे बांधली जाणार आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिका