Join us

पालिका कर्मचा:यांची घेतली झाडाझडती

By admin | Published: August 23, 2014 1:16 AM

ऐरोली विभागातील पालिका कर्मचा:यांची आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी झाडाझडती घेतली.

नवी मुंबई : ऐरोली विभागातील पालिका कर्मचा:यांची आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी झाडाझडती घेतली. उशिरा येणा:या कर्मचा:यांना व कामचुकारपणा करणा:यांना समज दिली आहे. पुन्हा कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
नवी मुंबई महापालिकेमधील कामकाजाला शिस्त लावण्यासाठी आयुक्त ज:हाड यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रत्येक विभागास भेट देवून कामांची माहिती घेतली जात आहे. आज सकाळी आयुक्तांनी अचानक ऐरोली विभागाचा दौरा केला. विभाग कार्यालयात हजेरी लावली असता काही कर्मचारी कामावर आले नसल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी कार्यालयाबाहेर खुर्चीवर बैठक मारून कोण कधी आले याची माहिती घेण्यास सुरुवात केली. उशिरा आलेल्या कर्मचा:यांची आयुक्तांना पाहताच गाळण उडाली. काय कारण सांगायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळेत कामावर आले पाहिजे. पुन्हा असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. जे कर्मचारी वेळेवर आले होते त्यांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला. 
या विभागातील साफसफाईच्या कामांचीही आयुक्तांनी पाहणी केली. काही ठिकाणी कामगार योग्यपद्धतीने काम करत होते. काही ठिकाणी मात्र नेमून दिलेल्या जागेवर कामगार आढळून आले नाहीत. कामचुकारपणा करणा:यांना आयुक्तांनी धारेवर धरले. पालिका कामगारांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुविधा दिल्यानंतर कामामध्येही सुधारणा झाली पाहिजे असे सुनावले. आयुक्तांच्या या दौ:यामुळे विभाग कार्यालयातील कर्मचारी व कंत्रटी कामगारांची धावपळ झाली होती. अगिAशमन दलास भेट देवून तेथील कामाचीही पाहणी करण्यात आली.  या पुढे प्रत्येक विभाग 
कार्यालयाच्या क्षेत्रमध्ये अशाचप्रकारे अचानक दौरा करून कामाची पाहणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
 
4आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी सांगितले की, शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कर्मचा:यांमध्ये शिस्त असली पाहिजे. कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अचानक दौरा केला. 
4काही कर्मचारी प्रामाणिकपणो काम करत होते. जे कामचुकारपणा करत असल्याचे व उशिरा आल्याचे निदर्शनास आले त्यांना समज दिली.
4पुन्हा कामात हालगर्जीपणा झाल्यास नियमाप्रमाणो कारवाई करण्यात येणार असून इतर विभागांच्या कामाचीही अशाचप्रकारे माहिती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
बायोमेट्रिक हजेरी सुरू 
4कंत्रटी कामगारांना महापालिकेच्या वतीने चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. परंतु काही कामगार प्रामाणिकपणो काम करत नाहीत. कामावर वेळेत येत नाहीत. कामकाजाला शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी सुरू करण्याचा विचार  केला आहे. वेळेवर 
कामावर न आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.