Join us

बायोमेट्रिक हजेरीविरोधात पालिका अभियंते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:27 AM

बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमुळे ४० हजार कर्मचारी-अधिका-यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार कापला गेल्याने महापालिकेत संतापाची लाट उसळली आहे. याविरोधात पालिकेच्या ४ हजार २०० अभियंत्यांनी आजपासून जादा कामावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमुळे ४० हजार कर्मचारी-अधिका-यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार कापला गेल्याने महापालिकेत संतापाची लाट उसळली आहे. याविरोधात पालिकेच्या ४ हजार २०० अभियंत्यांनी आजपासून जादा कामावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच या हजेरी पद्धतीतील त्रुटी दूर करण्यासाठी २२ मार्चपर्यंतची मुदत प्रशासनाला दिली आहे. अन्यथा महापालिकेचे १ लाख ४ हजार कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीने दिला आहे. जुलै २०१७पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. यासाठी महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ३ हजार ९०० मशिन्स लावण्यात आल्या आहेत. हजेरी वेळेत न लागल्यास त्या दिवसांचा पगार मिळणार नाही, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ३१ आॅक्टोबरला परिपत्रक काढून स्पष्ट केले होते. त्यामुळे मार्च महिन्यात जमा झालेल्या फेब्रुवारी महिन्याच्या पगारात मोठी कपात दिसून आली. या कारवाईबाबत पालिका कामगार व अधिकाºयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.>बायोमेट्रिकमधून अभियंत्यांना वगळापालिकेच्या ‘ड्युटी’ पद्धतीमुळे अभियंत्यांना १४ ते १६ तासांपर्यंत काम करावे लागत आहे. मेडिक्लेमची मागणीही प्रलंबित आहे. अभियंता विभागात तब्बल ३० टक्के कर्मचाºयांची कमतरता आहे. त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी जास्त असलेल्या रकमेची कामे एका अभियंत्यावर सोपवली जात आहेत. अशा स्थितीत काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अभियंत्यांची कामाची वेळ निश्चित करा, त्यांना बायोमेट्रिक हजेरीतून वगळा, अशी मागणी अभियंत्यांनी केली आहे.>गैरहजर कर्मचाºयांवर अशी कारवाईवेळेआधी कार्यालय सोडणे, अर्ध्या दिवसाची रजा घेऊन त्याची नोंद न करणे, तसेच कामांचे तास व वेळ नोंद न केल्यामुळे कर्मचाºयांचे पगार कापले आहेत.अर्धा दिवस सुट्टी किंवा सवलत घेऊन लवकर निघून जाणाºया कर्मचाºयांना त्याबाबतची नोंद खातेप्रमुखांच्या परवानगीने करावी लागणार आहे.काही जणांचे पगार कापून त्यांच्या खात्यात केवळ तीनशे ते चारशे रुपये जमा झाले आहेत.>गेल्या आठवड्यात केईएम रुग्णालयातील कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर सर्व अभियंत्यांनी आठ तासांच्या ड्युटीनंतर काम करण्यास नकार दिला आहे. अभियंत्यांनाआठ तासांची ड्युटी निश्चित करावी व या पद्धतीमध्ये बदल करावा, अशी मागणी कामगारांनी लावून धरली आहे. याबाबतचे निवेदन आयुक्त अजय मेहतायांना सोमवारी कामगार संघटनांनी दिले.>पालिकेवर २२ मार्चला मोर्चाबायोमेट्रिक हजेरीतील घोळामुळे कर्मचाºयांना गैरहजर दाखवून पगार कापला जात आहे. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी पगाराला लिंक करण्याआधी यातील त्रुटी दूर करा अशी मागणी कृती समितीने केली. या मागण्या मान्य करण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली तर २२ मार्च रोजी पालिकेचे कर्मचारी पालिकेवर धडक मोर्चा काढतील, असा इशारा समितीने दिला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका