पालिकेचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:07 AM2020-12-31T04:07:35+5:302020-12-31T04:07:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घराच्या वाढीव बांधकामासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालिकेचा कनिष्ठ अभियंता गणेश रमेश बडगे ...

Municipal junior engineer in ACB's net | पालिकेचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

पालिकेचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घराच्या वाढीव बांधकामासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालिकेचा कनिष्ठ अभियंता गणेश रमेश बडगे (२७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

बडगे हा दादर पश्चिमेकडील पालिकेच्या जी नॉर्थ विभागातील इमारती व कारखाने विभागात कार्यरत आहे. त्याने तक्रारदार यांच्या घराच्या वाढीव बांधकामाला विरोध करीत, १८ डिसेंबर रोजी बांधकाम बंद केले आणि कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार २३ डिसेंबर रोजी ते बडगेला भेटायला गेले. तेव्हा बडगेने त्यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेत, लेखी तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी सापळा रचून बडगेला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

..........................................

Web Title: Municipal junior engineer in ACB's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.