Join us

पालिकेचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घराच्या वाढीव बांधकामासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालिकेचा कनिष्ठ अभियंता गणेश रमेश बडगे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घराच्या वाढीव बांधकामासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालिकेचा कनिष्ठ अभियंता गणेश रमेश बडगे (२७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

बडगे हा दादर पश्चिमेकडील पालिकेच्या जी नॉर्थ विभागातील इमारती व कारखाने विभागात कार्यरत आहे. त्याने तक्रारदार यांच्या घराच्या वाढीव बांधकामाला विरोध करीत, १८ डिसेंबर रोजी बांधकाम बंद केले आणि कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार २३ डिसेंबर रोजी ते बडगेला भेटायला गेले. तेव्हा बडगेने त्यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेत, लेखी तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी सापळा रचून बडगेला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

..........................................