Join us

पालिकेचा लायसेन्स निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; १२ हजारांची मागितली होती लाच

By मनीषा म्हात्रे | Published: March 18, 2024 5:35 PM

पालवेने तक्रारदार यांना शटर अँण्ड बोर्डमाठी लागणारे कागदपत्रे घेवून हे येण्यास सांगितले

मुंबई : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पालिकेच्या मरीन लाईन्स पूर्वेकडील सी वार्डच्या लायसेन्स निरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

गणपत केशव पालवे असे लायसन्स निरीक्षकाचे नाव असून एका ज्वेलर्स शॉप मालकाला शटर अँण्ड बोर्डचे लायसेन्स देण्याच्यासाठी १२ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ज्वेलर्स शॉपमध्ये अकाऊट अँन्ड अस्टिटंटचे काम करतात. या शॉपचे मालक यांनी तक्रारदार यांना शटर अँण्ड बोर्ड चे लायसन्स काढण्याची जबाबदारी सोपवली होती. १२ मार्च रोजी तक्रारदार पालिकेच्या सी वार्ड येथे शटर अॅण्ड बोर्ड चे लायसन्स मिळण्याबाबतचा अर्ज देण्यासाठी गेल्या. पालवेने तक्रारदार यांना शटर अँण्ड बोर्डमाठी लागणारे कागदपत्रे घेवून हे येण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे घेवून अधिकाऱ्याला भेटताच, त्याने लायसेन्ससाठी त्याने १२ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी मालकाला याबाबत कालवून, एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार दिली. 

एसीबीच्या पडताळणीत तडजोडीअंती आरोपीने १० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचून अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवत तपास सुरू आहे.