Join us

CoronaVirus News in Mumbai: महानगरपालिकेचा लॉकडाऊन संपला, शंभर टक्के उपस्थितीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 12:36 AM

गेला दीड महिना केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू होते. मात्र सुधारित परिपत्रक काढून सर्व कर्मचा-यांना तातडीने कामावर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई : लॉकडाउनच्या काळात नागरी सेवा-सुविधांवर परिणाम होत आहे. तसेच कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कर्मचाऱ्यांना शंभर टक्के हजेरी लावण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. गेला दीड महिना केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू होते. मात्र सुधारित परिपत्रक काढून सर्व कर्मचा-यांना तातडीने कामावर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत केवळ ५० टक्के कर्मचाºयांच्या उपस्थितीत पालिकेचे कामकाज सुरू होते. मात्र कोरोनाचा प्रसार मुंबईत रोखण्यासाठी पालिका यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. पालिका रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचारी तसेच आरोग्य अधिकारी - कर्मचारी, विभाग कार्यालयातील कर्मचारी कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात सहभागी आहेत. परिणामी, लॉकडाउनचा कालावधी वाढला तरी पालिका प्रशासनाने आपल्या सर्व कर्मचाºयांना कामावर बोलावले आहे. यापैकी काही कर्मचाºयांची मदत कोरोना रोखण्यासाठी केली जाणार आहे. आवश्यकता असणाºया सुविधांसाठी उपलब्ध होणारे मनुष्यबळ संबंधित खातेप्रमुखाच्या ‘ना-हरकती’नंतर वापरता येणार आहे. हे परिपत्रक शुक्रवारी लागू करण्यात आले आहे. मात्र १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिना’ची सुट्टी आणि शनिवार, रविवार येत असल्याने सोमवारपासूनच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.>यांना मिळणार सूट व भत्तावय ५५ वर्षांपेक्षा जास्त असलेले कर्मचारी तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस अशा स्वरूपाचे गंभीर आजार असणाºया कर्मचाºयांना ३० एप्रिलपासून पुढील्लोकल बंद असल्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचणे आणि दैनंदिन जेवण-खाण्यासाठी ३०० रुपयांचा भत्ता देण्यात येईल. हा भत्ता डॉक्टरांनाही मिळणार असून, ही रक्कम त्यांच्या वेतनातून दिली जाणार आहे. तसेच सहायक अभियंता, संबंधित कर्मचाºयांनाही याचा लाभ मिळणार आहे.दिव्यांग कर्मचाº­यांची रोगप्रतिकारशक्ती सर्वसामान्य माणसांच्या तुलनेत कमी असते. तसेच दळणवळणाबाबत ऐनवेळी अडचणी येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनाही १५ मेपर्यंत कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.ा एक महिना अनुपस्थित राहता येणार आहे.>या कामांमध्ये कर्मचाºयांचा सहभाग घेणारयामध्ये उपलब्ध होणाº­या कर्मचाºयांचा वापर कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये केला जाणार आहे. यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा संपर्क शोधणे, क्वारंटाइन सेंटर मॅनेजमेंट, पालिका रुग्णालये-प्रयोगशाळांमध्ये साहाय्य अशा कामांचा समावेश असेल.>घराजवळच्या कार्यालयात काम करामहापालिकेच्या हद्दीबाहेर राहणाº­या म्हणजेच पनवेल, बदलापूर, आसनगाव, वसई किंवा त्यापुढे राहत असतील त्यांना त्यांच्या हद्दीपासून जवळ असणाºया पालिका कार्यालयात किंवा पालिकेच्या सेवेच्या ठिकाणी आपली सेवा बजावावी लागणार आहे.>...अन्यथा कारवाईपालिका प्रशासनाने काढलेल्या नव्या परिपत्रकानुसार कर्मचाºयांना कामावर हजर राहणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे विना परवानगी अनुपस्थित राहणाºया कर्मचाºयांना त्यांची रजा ‘बिनपगारी’ म्हणून नोंदविण्यात येणार आहे. तर गैरहजर राहणाºया कर्मचाºयांची सेवा खंडित करण्यात येणार नसली तरी ‘साथरोग कायदा १८९७’नुसार कारवाई करण्यात येईल. कर्मचारी गंभीर आजारी किंवा कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांना यातून सूट मिळणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्या