२७४१ बांधकामांना पालिकेची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2015 03:27 AM2015-07-10T03:27:20+5:302015-07-10T03:27:20+5:30

अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे डासांच्या उत्पत्तीचा धोका वाढला आहे़ विशेषत: बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे़

Municipal Notice to Construction of 2741 | २७४१ बांधकामांना पालिकेची नोटीस

२७४१ बांधकामांना पालिकेची नोटीस

Next

मुंबई : अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे डासांच्या उत्पत्तीचा धोका वाढला आहे़ विशेषत: बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने मुंबईतील अशा २७४१ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठवून डास प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची सक्त ताकीद दिली आहे़
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर साचून राहिलेले पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरते़ बांधकामाच्या ठिकाणी असे पाणी साचून राहत असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव होत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे़ त्यामुळे पालिकेने बांधकामांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक उपाययोजनेसाठी दहा कलमी कार्यक्रम राबविण्याचे आदेश विकासकांना दिले आहेत़
त्यानुसार बांधकाम परिसरात साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, मजुरांना डास प्रतिबंधक जाळ्या पुरविणे, डॉक्टरांची नेमणूक करणे, मजुरांना हेल्थ कार्ड देणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे़ मात्र यामध्ये कसूर करणाऱ्या विकासकांना इमारत प्रस्ताव विभागाद्वारे बांधकाम थांबविण्याची नोटीस देण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

अशा आहेत डास प्रतिबंधक उपाययोजना
 
> बांधकाम सुरू असलेल्या परिसरात पत्रे, पाण्याचे पिंप, हेल्मेट, घमेले या वस्तूंमध्ये पाणी साचून डासांच्या उत्पत्तीचा अड्डा बनणार नाही, याची खबरदारी घेणो़
> मजुरांच्या तात्पुरत्या निवा:यावर घातलेल्या ताडपत्रीमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घेणो़
> मजुरांचा राहण्याचा परिसर स्वच्छ असावा़
> इमारतीच्या बांधकाम परिसरामध्ये तळघर किंवा जमिनीच्या खाली असणा:या परिसरांमध्ये पावसाचे पाणी साचू नये, यासाठी अधिक क्षमतेचे पंप बसवून पाणी सातत्याने काढण्यात याव़े
> तळघर अथवा जमिनीच्या खाली असलेल्या बांधकाम परिसरांमध्ये प्रकाश असावा, यासाठी दिव्यांची व्यवस्था करावी़
च्बांधकामाच्या ठिकाणी शौचालय, न्हाणीघर अशा जागांसाठी राखून ठेवलेल्या खड्डय़ांमध्ये साचलेले पाणी त्वरित काढण्यात याव़े
> मजुरांना डास प्रतिबंधक जाळ्या पुरविण्यात याव्यात़
> बांधकामांच्या ठिकाणी डॉक्टर असावा़
> मजुरांना हेल्थकार्ड देण्यात याव़े
> नवीन आलेल्या मजुरांची मलेरियाविषयक रक्त चाचणी करण्यात यावी़
-------------
बांधकामांना वॉर्डनिहाय नोटीस
कुलाबा, फोर्ट - २६, मोहम्मद अली रोड - १७, चिराबाजार- ५४, ग्रँट रोड- ८४, भायखळा - ८६, दक्षिण मध्य मुंबई- ३१२, वांदे्र ते विलेपार्ले - ३१८, अंधेरी ते जोगेश्वरी- ४८१, गोरेगाव - १७१, मालाड - २२५, कांदिवली - ११३, बोरीवली - १११, दहिसर - ७७, कुर्ला - १२४, चेंबूर - ४४, मानखुर्द, गोवंडी - १४५, घाटकोपर - ११७, भांडुप - १२२, मुलुंड - ११४़

Web Title: Municipal Notice to Construction of 2741

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.